Kapus Kharedi : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर लाडसावंगी येथे खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली. यंदाच्या हंगामातील पहिल्याच दिवशी कापसाला प्रतिक्विंटल तब्बल ९ हजार रुपये इतका दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. पांढऱ्या सोन्याला यंदा चांगली चकाकी येण्याची चिन्हे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(Kapus Kharedi)
दरवाढीमागील कारणे
यावर्षी राज्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. तसेच, दरवर्षीच्या तुलनेत लागवडीचे क्षेत्रही कमी झाले. उत्पादन घटल्याने आणि मागणी वाढल्याने दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.(Kapus Kharedi)
खाजगी व्यापाऱ्यांनी सांगितले की, पिकांचे नुकसान झाले असले तरी पुरवठा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे. (Kapus Kharedi)
शेतकऱ्यांच्या अपेक्षा
सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील अनेक भागातील कापूसपिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बाजारात चांगला दर मिळणे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे आहे. शेतकऱ्यांना पुढील काळात दर आणखी वाढतील अशी आशा आहे.(Kapus Kharedi)
कार्यक्रमात उपस्थिती
खासगी व्यापाऱ्यांच्या या खरेदी उपक्रमाच्या वेळी सुदाम पवार, प्रमोद भालेराव, अनिल पडुळ, भाऊसाहेब पडुळ, विलास दाभाडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
लाडसावंगी येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीला झालेला शुभारंभ हा शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरला आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ९ हजार रुपयांचा दर मिळाल्याने या हंगामात कापसाला चांगली किंमत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.