Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Bajarbhav : पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Kapus Bajarbhav : पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Kapus Bajarbhav How will cotton prices be next week Know in detail | Kapus Bajarbhav : पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Kapus Bajarbhav : पुढील आठवड्यात कापसाचे दर कसे राहतील? जाणून घ्या सविस्तर 

Kapus Bajarbhav : सद्यस्थितीत कापसाला कमीत कमी सात हजार १०० रुपयांपासून ते ०८ हजार १२ रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे.

Kapus Bajarbhav : सद्यस्थितीत कापसाला कमीत कमी सात हजार १०० रुपयांपासून ते ०८ हजार १२ रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kapus Bajarbhav : गेले काही दिवस कापसाच्या बाजारभावात (Cotton Market) सातत्याने घसरण सुरू होती. मात्र मागील काही दिवसात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीत कमीत कमी सात हजार १०० रुपयांपासून ते ०८ हजार १२ रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे. तर या एप्रिल महिन्यात (Cotton Market In April End) कापसाच्या किमती अंदाजे ०७ हजार रुपयांपासून ते ०७ हजार ७०० रुपयांपर्यंत मिळत असल्याचे चित्र आहे.

कापसाचे बाजार भाव मागील वर्षी आणि यंदा कसे आहेत तेही पाहूयात.. यामध्ये २०२३-२४ मध्ये ऑक्टोबर महिन्यात ०७ हजार २०० रुपयापासून ते ०७ हजार ७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये साधारण ०७ हजार रुपयांपासून ते ०७ हजार १०० रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर एप्रिल मध्ये सरासरी ०७ हजार १४७ रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तर यंदाच्या वर्षी म्हणजे २०२४- २५ मध्ये ०८ हजार ५०० रुपयापर्यंत दर मिळाला होता. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून कापसाच्या बाजारभाव घसरण सुरू झाली ती मागील मार्च महिना पर्यंत होती. जवळपास ०७ हजार ७०० रुपयांपर्यंत दर खाली आले. दरम्यान एप्रिलच्या शेवटी हे बाजारभाव ०७ हजार ते ०७ हजार ७०० रुपयापर्यंत राहतील अशी शक्यता आहे.

२०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे.

Web Title: Latest News Kapus Bajarbhav How will cotton prices be next week Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.