Lokmat Agro >बाजारहाट > Cotton Market : ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये कापसाला काय भाव मिळणार? वाचा सविस्तर 

Cotton Market : ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये कापसाला काय भाव मिळणार? वाचा सविस्तर 

Latest News Kapus bajarbhav how was Cotton Market from October to December 2025 Read in detail | Cotton Market : ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये कापसाला काय भाव मिळणार? वाचा सविस्तर 

Cotton Market : ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 मध्ये कापसाला काय भाव मिळणार? वाचा सविस्तर 

Cotton Market : येत्या ऑक्टोबर-डिसेंबर 2025 मध्ये कापसाला क्विंटलमागे काय भाव मिळतील? हे समजून घेऊयात....

Cotton Market : येत्या ऑक्टोबर-डिसेंबर 2025 मध्ये कापसाला क्विंटलमागे काय भाव मिळतील? हे समजून घेऊयात....

शेअर :

Join us
Join usNext

Cotton Market : मागील तीन वर्षातील राजकोट बाजारातील कापसाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील आहेत. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये  ७९३९ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये ८७१० रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ मध्ये ७०८९ रुपये प्रति क्विंटल होत्या. माहे जून, २०२५ ची किंमत दि. २० जून पर्यंतची आहे.

खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची  (Kapus Market) किमान आधारभूत किंमत (MSP) रु. ७७१० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार ४०० ते ८ हजार ४०० प्रति क्विंटल राहतील, असा अंदाज आहे. 

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १०.७३ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. देशात चालू वर्षीच्या मे २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या मे २०२४ च्या तुलेनत ४९.८४ टक्क्यांनी घटली आहे.

USDA-FAS च्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन २५.४ दशलक्ष ४८० lb bales आहे., शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळवतील या अपेक्षेमुळे पेरणी केलेल्या १२.४ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील गाठी मागील वर्षाच्या तुलनेत दोन टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

- बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामध्ये मका पिकाबाबत हा अंदाज वर्तविला आहे.

Web Title: Latest News Kapus bajarbhav how was Cotton Market from October to December 2025 Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.