Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

Latest News Kapus Bajar bhav How will cotton prices be May last two weeks see details | Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

Kapus Bajarbhav : मागील तीन वर्षात मे महिन्यात कापसाचे दर कसे होते? यंदा मे 2025 मध्ये कसे आहेत? 

Kapus Bajarbhav : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते.

Kapus Bajarbhav : कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते.

शेअर :

Join us
Join usNext

Kapus Bajarbhav :  मागील तीन वर्षातील राजकोट बाजारातील कापसाच्या (Kapus Bajar Bhav) मे महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर मे २०२२ रुपये ११ हजार ८०४ रुपये प्रति क्विंटल, मे २०२३ रुपये ७ हजार ५८७ प्रति क्विंटल, मे २०२४ रुपये ७ हजार ३६१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. यंदाच्या मे २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार २०० ते ७ हजार ८०० प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची (Cotton Market) किमान आधारभूत किंमत (MSP) रु. ७१२१ प्रत्ति क्विटल इतकी जाहीर करण्यात आली आहे. कापूस हे भारतातील सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक आहे, जे 'व्हाइट-गोल्ड म्हणून ओळखले जाते. जागतिक स्तरावर चीन आणि यूएसए नंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश असून एकूण जागतिक कापूस उत्पादनापैकी २५ टक्के वाटा भारताचा आहे.

Tur Market : पुढील वीस दिवस तुरीचे प्रति क्विंटल दर कसे राहतील? वाचा सविस्तर

राष्ट्रीय आयात आणि निर्यातीच्या बाबतीत, मागील वर्षाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये आयातीत आणि निर्यातीत वाढ होण्याचा अंदाज आहे. हाच कल जागतिक पातळीवर दिसला असून मागील वर्षीच्या तुलनेत आयात व निर्यातीमध्ये सरासरी ६ टक्के वाढ झाली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १०.७३ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

गाठी घटण्याचा अंदाज 
२०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच, गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टीकोन सुधारला असूनही २०२४-२५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे. देशात चालू वर्षीच्या मार्च २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या मार्च २०२४ च्या तुलेनत २१.२० टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: Latest News Kapus Bajar bhav How will cotton prices be May last two weeks see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.