Join us

Kanda Niryat : मागील वर्षापेक्षा यंदा कांदा निर्यातीमध्ये 'इतकी' घट झाली? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 15:33 IST

Kanda Niryat : चालू वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात २ हजार ६६३ कोर्टीच्या कांद्याची निर्यात झाली आहे.

नाशिक : मागील वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीत (Onion Export) तब्बल ६९६ कोटी रुपयांची घट झाली असून निर्यात शुल्कामुळे मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. चालू वर्षातील एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात २,६६३ कोर्टीच्या कांद्याची निर्यात झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ३,३५९ कोटींची निर्यात झाली होती. याचाच अर्थ मागील वर्षापेक्षा यंदा २० टक्क्यांनी निर्यातीमध्ये घट झाली आहे.

मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत १६.२६ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात (Kanda Niryat) झाला होता. मात्र, यंदा त्यात ट झाली आहे. आकडेवारीनुसार, यंदा एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये निर्यातीचा आकडा १७.१७ लाख मेट्रिक टनांवर पोहोचला असला, तरी उत्पन्नात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कांदा उत्पादक (Onion Farmers) आणि व्यापाऱ्यांच्या मते, केंद्र सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे परदेशी बाजारपेठांमध्ये भारताचे स्थान डळमळीत झाले आहे. 

चीन, इजिप्त आणि पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर कांदा पुरवठा होत असल्याने भारतीय कांद्याला मागणी कमी होत आहे. आमच्या कष्टाने पिकविलेल्या कांद्यावर सरकार शुल्क आकारून आमची लूट करत आहे. सरकारने निर्यात धोरण पूर्णतः मुक्त करावे आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लादलेली बंधने आणि शुल्क शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. यामुळे निर्यातीत घट होऊन भारताच्या परकीय चलनात मोठी घट होत आहे.

कांदा निर्यात कोणत्या वर्षी किती? मागील काही वर्षात कांदा निर्यात पाहिली तर २०१८-१९ साली २१.८३ लाख टन, २०१९-२० मध्ये ११.४९ लाख टन, २०२०-२१ मध्ये १५.७७ लाख टन, २०२१-२२ मध्ये १५.३७ लाख टन, २०२२-२३ मध्ये २५.२५ लाख टन, २०२३-२४ मध्ये १७.१७ लाख टन निर्यात झाली आहे. तर कांदा निर्यातदार प्रमुख देशांमध्ये बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका, नेपाळ, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया, कतार, हाँगकाँग, कुवेत, व्हिएतनाम या देशांचा समावेश होतो. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक