Join us

Kanda Market Update : पारनेर बाजारात लाल कांद्याला सरासरी काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 18:42 IST

Kanda Market Update : आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी राज्यातील बाजारात 22 हजार 836 क्विंटल कांद्याची (Onion Arrival) आवक झाली.

Kanda Market Update :  आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी राज्यातील बाजारात 22 हजार 836 क्विंटल कांद्याची (Onion Arrival) आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात (Ahilyanagar Kanda Market) लाल कांद्याची (Lal Kanda Bajarbhav) सर्वाधिक 16 हजार क्विंटल तर पुणे बाजारात सर्वसाधारण कांद्याची 2 हजार क्विंटल आवक झाली. तर आज कांद्याला कमीत कमी 1425 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज लाल कांद्याला पारनेर बाजारात (Red Onion Market) कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 2300 रुपये आणि राहता बाजारात कमीत कमी 400 रुपये, तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे-पिंपरी बाजारात कमीत कमी एक हजार रुपये तर सरासरी 02 हजार रुपये, पुणे मोशी बाजारात कमीत कमी 700 रुपये, तर सरासरी 1850 रुपये आणि मंगळवेढा बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 2200 रुपये दर मिळाला. 

तसेच सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजारात कमीत कमी 550 रुपये तर सरासरी 1425 रुपये, दौंड-केडगाव बाजारात कमीत कमी 700 रुपये तर सरासरी 2500 रुपये आणि सातारा बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 02 हजार रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

19/01/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल291755023001425
दौंड-केडगाव---क्विंटल227670032002500
सातारा---क्विंटल188100030002000
कराडहालवाक्विंटल210100025002500
पारनेरलालक्विंटल1475050033002300
राहतालालक्विंटल179440032002100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13100030002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल66870030001850
मंगळवेढालोकलक्विंटल2060029002200
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डअहिल्यानगरनाशिक