Join us

Kanda Market Update : मागील आठवडाभरात कांद्याचे भाव 21 टक्क्यांनी घसरले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 20:29 IST

Kanda Market Update : गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव (Onion Rates) झपाट्याने घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Kanda Market Update : काही महिन्यांपूर्वी समाधानकारक असलेले बाजारभाव (Kanda Bajarbhav) आता प्रचंड घसरले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याचे भाव (Onion Rates) झपाट्याने घसरले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज थेट रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागील आठवडाभरात जवळपास २१ टक्क्यांची घसरण झाली आहे. 

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक (Kanda Farmer) राज्यातील अनेक बाजारपेठांमध्ये अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की फक्त एका आठवड्यात कांद्याचे दर २१ टक्क्यांनी घसरले आहेत, जे दिवसेंदिवस शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण बनत आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका आठवड्यात (४ ते ११ जानेवारी २०२५) कांद्याची सरासरी किंमत २२५८ रुपयांवरून १७९१ रुपये प्रति क्विंटलवर घसरली आहे. म्हणजेच फक्त एका आठवड्यात ते ४५० रुपयांनी कमी झाले आहे. या २१ टक्क्यांच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पसरले आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे, तर भारतातील सर्वात मोठे कांदा उत्पादक राज्य महाराष्ट्र आहे, जिथे देशातील ४३ टक्के कांद्याचे उत्पादन होते. कांद्याच्या सतत घसरणाऱ्या किमतीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. सरकारने निर्यात शुल्क हटवले पाहिजे, अशी शेतकरी करीत आहेत. 

आजचे लासलगाव बाजारातील कांदा बाजारभाव दरम्यान ६ जानेवारी रोजी लासलगाव बाजारात लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये, ७ जानेवारी रोजी २४०० रुपये, ८ जानेवारी रोजी २३५१ रुपये, ९ जानेवारी रोजी २२०० रुपये, १० जानेवारी रोजी १९०० रुपये, ११ जानेवारी रोजी १७८० रुपये आणि आज १३  जानेवारी रोजी १९५१  रुपये दर मिळाला. म्हणजेच लासलगाव बाजारात आठवडाभरात ५५० रुपयांची घसरण झाली आहे. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकशेती