Join us

दिवाळीनिमित्त काही कांदा बाजारपेठ बंद, वसुबारसेला निवडक बाजारात काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 16:38 IST

Diwali Kanda Market : दिवाळी सणाचे निमित्त समोर ठेवून राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक : दिवाळी सणाचे निमित्त समोर ठेवून राज्यातील विविध कांदा बाजारपेठा तब्बल ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आधीच तोट्यात असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे, असे तीव्र मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे.

भारत दिघोळे म्हणाले, “कांदा शेतकरी दिवसरात्र राबून उत्पादन घेतो, आणि त्याचा माल विक्रीसाठी आणल्यावर बाजार बंद असल्याची पाटी त्याच्या तोंडावर आपटली जाते. शेतकऱ्यांना दगड समजून त्यावर चालल्यासारखी वागणूक देणे आता थांबवले पाहिजे. हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असून, शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभमुहूर्तावरही अन्यायच मिळतो.”

त्यांनी पुढे म्हटले की, “राज्य सरकारने बाजार समित्यांवर शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. बाजारपेठा कोणाच्या खाजगी मालकीच्या नसून, त्या शेतकऱ्यांच्या श्रम आणि उत्पादनावर उभ्या आहेत. जास्त दिवस बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे लिलाव बंद ठेवण्याचे अधिकार हे सणाचे प्रमुख दिवसांपूरते मर्यादित असावेत आणि शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचवणारे निर्णय घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.”

दिघोळे यांनी मागणी केली की, शासनाने तातडीने या मुद्यावर लक्ष घालून शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात आधीच शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. 

आता एकाच वेळी जास्त दिवस बाजार समित्या बंद राहिल्या तर पुन्हा बाजार समित्या सुरू झाल्यानंतर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढून यापेक्षाही कमी दर मिळण्याचे संकटं शेतकऱ्यांवर येईल त्यामुळे राज्य सरकारने कांदा बाजारपेठेचे सुयोग्य नियमन आणि पारदर्शक व्यवहारासाठी ठोस धोरणाची अंमलबजावणी करावी.

वाचा आज काय दर मिळाले? 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/10/2025
अकलुज---क्विंटल3252001500900
कोल्हापूर---क्विंटल41725001800900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल520150025002000
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल842880018001300
खेड-चाकण---क्विंटल20060014001100
राहता---क्विंटल556140016001000
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल12016100016101340
सोलापूरलालक्विंटल170121002200900
धुळेलालक्विंटल11726001100900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल449100020001500
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल578650018001150
पुणे- खडकीलोकलक्विंटल247001200950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11120015001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल6214001000700
इस्लामपूरलोकलक्विंटल15050016001000
मंगळवेढालोकलक्विंटल1491001400800
कामठीलोकलक्विंटल52154030402290
कल्याणनं. १क्विंटल3100015001250
कल्याणनं. २क्विंटल3500800650
येवलाउन्हाळीक्विंटल30001261188750
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल25001501100850
कळवणउन्हाळीक्विंटल69502001500900
मनमाडउन्हाळीक्विंटल300020012101000
सटाणाउन्हाळीक्विंटल90251501660950
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1330030020111125
भुसावळउन्हाळीक्विंटल685001000800
English
हिंदी सारांश
Web Title : Onion market closures during Diwali; rates on Vasubaras revealed.

Web Summary : Diwali closures hit onion farmers hard. Farmer leader demands regulation, fair prices. Select markets saw rates between ₹100-₹3040/quintal on Vasubaras.
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्रदिवाळी २०२५