Join us

Kanda Market : अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याला 'इतक्या' रुपयांचा दर, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:52 IST

Kanda Market Update : यात अहिल्यानगर बाजारात सर्वाधिक उन्हाळ कांदा (Unhal Kanda) तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची सर्वाधिक आवक झाली.

Kanda Market Update : आज रविवार दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये 58 हजार 912 क्विंटल कांद्याचे आवक झाली. यात अहिल्यानगर बाजारात सर्वाधिक उन्हाळ कांदा तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याची (Local Kanda Market) सर्वाधिक आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2150 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज भुसावळ बाजारात लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 1200 रुपये, तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तर अकोले बाजारात उन्हाळा कांद्याला कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 2100 रुपये दर मिळाला. तसेच पारनेर बाजारात उन्हाळ कांद्याची 16894 क्विंटलची आवक होऊन 1950 रुपये असा सरासरी दर मिळाला. 

तर लोकल कांद्याला पुणे बाजारात (Pune Kanda Market) कमीत कमी 1500 रुपये, तर सरासरी 02 हजार रुपये, पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी 1300 रुपये, तर सरासरी 1900 रुपये आणि सर्वसाधारण कांद्याला दौंड-केडगाव बाजारात सरासरी 02 हजार रुपये, सातारा बाजारात 2150 रुपये, राहता बाजारात 2050 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/02/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल594050023001400
दौंड-केडगाव---क्विंटल525650026002000
सातारा---क्विंटल336150028002150
राहता---क्विंटल312630027002050
भुसावळलालक्विंटल33120025002100
पुणेलोकलक्विंटल23836150025002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10130025001900
पुणे-मोशीलोकलक्विंटल53180022001500
अकोलेउन्हाळीक्विंटल295030026112100
पारनेरउन्हाळीक्विंटल1689450027001950
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकशेती