Join us

रविवारी कांद्याची आवक कमी झाली, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे बाजारात काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 17:32 IST

Kanda Market : यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती, संभाजीनगर, जळगाव, नागपूर, पुणे, सातारा, सोलापूर या बाजाराचा समावेश आहे.

Kanda Market :    आज रविवार दिनांक २० जुलै रोजी राज्यातील निवडक बाजार समितीमध्ये २५ हजार ९६२ क्विंटल कांद्याची (Kanda Avak) आवक झाली. यामध्ये अहिल्यानगर, छत्रपती, संभाजीनगर, जळगाव, नागपूर, पुणे, सातारा, सोलापूर या बाजाराचा समावेश आहे. आज कांद्याला कमीत कमी ७७५  रुपयांपासून सरासरी १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Kanda Market) मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याची आवक होऊन कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १२५० रुपये तर पुणे बाजारात कमीत कमी ५०० तर सरासरी ११०० रुपये त्याचबरोबर पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी ७५० तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. 

तसेच उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) पारनेर बाजारात कमीत कमी २०० रुपये तर सरासरी १४०० रुपये, भुसावळ बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १००० रुपये तर रामटेक बाजारात सरासरी १६०० रुपयांचा दर मिळाला. 

दुसरीकडे सर्वसाधारण कांद्याची छत्रपती संभाजी नगर बाजारात आवक होऊन कमीत कमी २५० तर सरासरी ७७५ रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये सरासरी १३०० रुपये, सातारा कांदा मार्केट ला १५०० रुपयांचा दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/07/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल45362501300775
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल92330018001300
सातारा---क्विंटल223100020001500
राहता---क्विंटल675040018001200
पुणेलोकलक्विंटल927350017001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल2570014001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल32100017001350
पुणे-मोशीलोकलक्विंटल43380016001200
मंगळवेढालोकलक्विंटल1720014001250
पारनेरउन्हाळीक्विंटल365420018251400
भुसावळउन्हाळीक्विंटल6680012001000
रामटेकउन्हाळीक्विंटल30150020001600
टॅग्स :कांदामार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र