Join us

Kanda Market : आज 20 सप्टेंबरला कांद्याला सरासरी काय भाव मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 17:48 IST

Kanda Market : आज २० सप्टेंबर रोजी कांद्याला सरासरी के भाव मिळाले, ते पाहुयात..

Kanda Market :  आज २० सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला. 

राज्यातील बाजार समित्यांमध्ये ७६ हजार ३९७ क्विंटल कांद्याची आवक झाली. येवला    बाजारात ८५० रुपये, भुसावळ बाजारात १ हजार रुपये, रामटेक बाजारात १३०० रुपये दर मिळाला. 

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, जळगाव बाजारात सरासरी ७७५ रुपये, नागपूर बाजारात १३२५ रुपये, पुणे -पिंपरी बाजारात १२५० रुपये दर मिळाला. 

काही निवडक बाजारातील दर 

  • कोल्हापूर मार्केट - सरासरी दर - १००० रुपये. 
  • अकोला मार्केट - सरासरी दर - १२०० रुपये 
  • छत्रपती संभाजीनगर - सरासरी दर - ८०० रुपये 
  • शिरपूर मार्केट - सरासरी दर - ७०० रुपये 
  • अमरावती- फळ आणि भाजीपाला - सरासरी दर - १४०० रुपये 
  • मंगळवेढा मार्केट - सरासरी दर - १००० रुपये 
  • नागपूर मार्केट - सरासरी दर - १७०० रुपये (पांढरा कांदा)
  • शेवगाव मार्केट - सरासरी दर - १२०० रुपये (नंबर १ कांदा
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक