Join us
Daily Top 2Weekly Top 5

17 डिसेंबर रोजी लासलगाव, सोलापूर मार्केटमध्ये कांद्याला काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 19:55 IST

Kanda Bajarbhav :  आज १७ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख ८६ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav :    आज १७ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख ८६ हजार क्विंटल कांदा आवक झाली. आज लासलगाव बाजारामध्ये कमीत कमी सहाशे रुपये तर सरासरी २४५१ रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारामध्ये कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी २२०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

तसेच नाशिक बाजारात सरासरी १४०० रुपये, कोपरगाव बाजारात २३५० रुपये, बाजारात १२०० रुपये तर देवळा बाजारात १८०० रुपये दर मिळाला. तसेच संगमनेर बाजारात १७५० रुपये, सिन्नर बाजारात २३०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला सरासरी २३०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

दुसरीकडे लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी १७०० रुपये, लासलगाव बाजारात २३५१ रुपये, संगमनेर बाजारात १७६० रुपये, पारनेर बाजारात १८०० रुपये, देवळा बाजारात २२०० रुपये असा दर मिळाला. त्याचबरोबर नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८५० रुपये तर मंगळवेढा बाजारात लोकल कांद्याला सरासरी २५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Prices in Lasalgaon, Solapur Markets on December 17: Details Here

Web Summary : On December 17th, Lasalgaon market saw onion prices averaging ₹2451/quintal. Other markets like Nashik, Kopargaon, and Deola reported average rates between ₹1400 to ₹2350. Solapur's red onions fetched ₹1700, while Mangalvedha's local onions reached ₹2500/quintal. Over 1.86 lakh quintals of onions arrived in state markets.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक