Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : प्रजासत्ताक दिनाला कांद्याला सरासरी भाव काय राहीले, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 21:11 IST

Kanda Market : आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ३३ हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राज्यातील कांदा मार्केटमध्ये ३३ हजार क्विंटल कांदा आवक झाली. आजच्या दिवशी अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्येच लिलाव पार पडले कमीत कमी ६०० रुपयांपासून सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात लाल कांद्याची सर्वाधिक २८ हजार क्विंटल आवक झाली. कमीत कमी २५० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला  तर पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ०१ हजार रुपये आणि सरासरी १३०० रुपये, याच जिल्ह्यात चिंचवड कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये आणि सोलापूर जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला. 

तसेच नंबर १ च्या कांद्याला अहिल्यानगर जिल्ह्यात कमीत कमी १३०० रुपये तर सरासरी १४५० रुपये तर नंबर ०२ च्या कांद्याला कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ८५० रुपये तर नंबर ३ च्या कांद्याला कमीत कमी २०० रुपये तर सरासरी ३५० रुपयांपर्यंत असा दर मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Republic Day Rates and Market Report

Web Summary : Republic Day saw 33,000 quintals of onion arrivals. Prices ranged from ₹600 to ₹1400. Ahmednagar saw highest arrivals. Number one quality fetched ₹1450.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक