Join us

Kanda Market : मुंबई, नाशिकमध्ये कांद्याचे दर घसरले, नागपूर, सोलापूर बाजारात काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 18:06 IST

Kanda Market : आज १ लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात सव्वा लाख क्विंटल कांदा दाखल झाला.

Kanda Market :  आज ०८ सप्टेंबर रोजी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२७५ रुपये दर मिळाला. तर पाच दिवसांपूर्वी याच बाजारात सरासरी १३१० रुपये दर मिळाला होता. जवळपास ३५ रुपयांनी दर घसरल्याचे दिसून आले. 

आज १ लाख ८७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) सव्वा लाख क्विंटल कांदा दाखल झाला. यामध्ये येवला बाजारात सरासरी ९५० रुपये, पिंपळगाव(ब) - सायखेडा बाजारात ११३० रुपये, कळवण बाजारात ११०० रुपये, देवळा, उमराणे बाजारात १२०० रुपये, संगमनेर बाजारात ९३१ रुपये असा उन्हाळ कांद्याला दर मिळाला.  

तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजारात सरासरी १४५० रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला सरासरी १३०० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला १८०० रुपये तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये १३०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/09/2025
कोल्हापूर---क्विंटल529650018001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल16973001200750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल260180030002200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल17327100016001300
विटा---क्विंटल50100018001750
सातारा---क्विंटल126100020001500
कराडहालवाक्विंटल15030017001700
सोलापूरलालक्विंटल1980110023001100
धुळेलालक्विंटल86540011501100
नागपूरलालक्विंटल2000100016001450
हिंगणालालक्विंटल34100020001628
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल25080030001900
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल286750017001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11100016001300
पुणे-मोशीलोकलक्विंटल103850015001000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल105070011501020
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल1842001400800
मंगळवेढालोकलक्विंटल25220015001300
कामठीलोकलक्विंटल12153020301780
शेवगावनं. १क्विंटल965130016001450
शेवगावनं. २क्विंटल91670012001050
शेवगावनं. ३क्विंटल1460200600450
नागपूरपांढराक्विंटल1360120020001800
येवलाउन्हाळीक्विंटल80002001381950
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल500030013021000
लासलगावउन्हाळीक्विंटल848450016521275
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450050016011270
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1300025014501075
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल72320013201175
कळवणउन्हाळीक्विंटल2065040017001100
संगमनेरउन्हाळीक्विंटल63241511711931
चांदवडउन्हाळीक्विंटल950040016411230
कोपरगावउन्हाळीक्विंटल460850014701150
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल471570013001130
देवळाउन्हाळीक्विंटल778120014651200
उमराणेउन्हाळीक्विंटल1860060015001200
नामपूरउन्हाळीक्विंटल260030015051200
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1500030016051250
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक