Kanda Market : आज शनिवार १५ नोव्हेंबर रोजी राज्यात एकूण ७७ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ४० हजार क्विंटल सोलापूर जिल्ह्यात लाल कांद्याची १७ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.
लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १५०० रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १४७५ रुपये आणि सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ८५० रुपये दर मिळाला.
जिल्हानिहाय कांदा बाजार भाव पाहिले तर पुणे जिल्ह्यात सरासरी १२७५ रुपये, नाशिक जिल्ह्यात सरासरी १२४० रुपये, नागपूर जिल्ह्यात १४५० रुपये, सोलापूर जिल्ह्यात ८५० रुपये दर मिळाले.
जळगाव जिल्ह्यात १२०० रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ७५० रुपये, अहिल्या नगर जिल्ह्यात १ हजार रुपये असा दर मिळतो आहे. त्यामध्ये लाल, उन्हाळ आणि लोकल कांद्याचा समावेश आहे.
वाचा आजचे बाजारभाव
Web Summary : On Saturday, 77,000 quintals of onions arrived in Maharashtra markets. Lasalgaon saw average prices of ₹1500, Solapur ₹850. Pune averaged ₹1275, Nashik ₹1240. Ahilyanagar fetched ₹1000.
Web Summary : शनिवार को महाराष्ट्र के बाजारों में 77,000 क्विंटल प्याज की आवक हुई। लासलगाँव में औसत दर ₹1500, सोलापुर में ₹850 रही। पुणे में औसत ₹1275, नासिक में ₹1240 और अहिल्यानगर में ₹1000 मिला।