Join us

Kanda Market : रक्षाबंधनाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 22:20 IST

Kanda Market : आज रक्षाबंधनाच्या दिवशी कांद्याला काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market : आज शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी राज्यातील कांदा बाजारात (Kanda Market) २६ हजार ९९३ क्विंटल आवक झाली. यात लासलगाव - निफाड बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपये दर मिळाला.

उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) मनमाड बाजारात सरासरी १२७० रुपये, भुसावळ बाजारात १००० रुपये, गंगापूर बाजारात  ११८० रुपये, रामटेक बाजारात १५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला सरासरी १४२५ रुपये दर मिळाला. 

तसेच पुणे - पिंपरी बाजारात सरासरी १४०० रुपये, अमरावती फळे भाजीपाला मार्केटमध्ये १५०० रुपये, मंगळवेढा बाजारात १५०० रुपये, वाई बाजारात १५०० रुपये तर कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १००० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

09/08/2025
अहिल्यानगरनं. १क्विंटल1400140017001550
अहिल्यानगरनं. २क्विंटल186070013001050
अहिल्यानगरनं. ३क्विंटल1420300600450
अमरावतीलोकलक्विंटल37060024001500
चंद्रपुर---क्विंटल380150030001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21732001300750
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल145030013751180
जळगावउन्हाळीक्विंटल1880012001000
कोल्हापूर---क्विंटल270550020001000
कोल्हापूरलोकलक्विंटल270120020001400
नागपूरलोकलक्विंटल2133618361586
नागपूरलालक्विंटल100070017001450
नागपूरपांढराक्विंटल82060017001425
नागपूरउन्हाळीक्विंटल10140016001500
नाशिकउन्हाळीक्विंटल250040013761285
पुणेनं. १क्विंटल34430015001200
पुणेलोकलक्विंटल70076712671017
सांगलीलोकलक्विंटल245250016501075
सातारालोकलक्विंटल15100017001500
सातारालालक्विंटल50100020001500
सोलापूरलोकलक्विंटल2580018001500
सोलापूरलालक्विंटल702910021501100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)26993 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीनाशिक