Join us

Kanda Market : लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याच्या दरात बदल, रविवारी काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 17:50 IST

Kanda Market : अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ११ हजार क्विंटल तर लाल कांद्याची ०८ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market : आज १७ ऑगस्ट रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Kanda Market) २९ हजार २४६ क्विंटल आवक झाली. यात अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ११ हजार क्विंटल तर लाल कांद्याची ०८ हजार क्विंटल आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी ११०० रुपयांपासून ते सरासरी १६०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market) अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर बाजारात कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी १५५० रुपये, वैजापूर- शिऊर बाजारात कमीत कमी ४५० रुपये तर सरासरी १४५० रुपये तर रामटेक बाजारात सरासरी १६०० रुपये दर मिळाला. 

तर धाराशिव बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १२०० रुपये तर सरासरी १६०० रुपये, पुणे पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १५०० रुपये, वाई बाजारात सरासरी १५०० रुपये तर शिरूर कांदा मार्केटमध्ये सर्वसाधारण कांद्याला सरासरी १५०० रुपये दर मिळाला. 

Kanda Market : मागील सहा दिवसांत कांदा आवक किती झाली, काय दर मिळाले?

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

17/08/2025
दौंड-केडगाव---क्विंटल346140022001500
शिरुर-कांदा मार्केट---क्विंटल273930021001500
राहता---क्विंटल892640024001500
धाराशिवलालक्विंटल65120020001600
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल21130017001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल65970015001100
वाईलोकलक्विंटल15100018001500
पारनेरउन्हाळीक्विंटल1184430021001550
वैजापूर- शिऊरउन्हाळीक्विंटल148445017001450
रामटेकउन्हाळीक्विंटल32140016001500
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक