Kanda Bajarbhav : गेल्या दीड महिन्यापासून कांद्याने शेतकऱ्यांना मेटाकुटीला (Kanda Market) आणले आहे. बाजारभावात सातत्याने घसरण सुरूच आहे. कांद्याची लासलगाव (Lasalgaon Kanda Market) बाजारातील मागील सप्ताहातील सरासरी किंमती १५८८ रुपये प्रति क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ३० टक्के घट झाली आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे २७.७३ टक्के व २८.५२ टक्के इतकी घट झाली आहे. मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी लासलगाव (निफाड) बाजारात (Nashik Kanda Market) कांद्याच्या सरासरी किंमत सर्वाधिक रु. १५८८ क्विंटल होती, तर अहिल्यानगर बाजारात सर्वात कमी किंमत रुपये ८०० रुपये क्विंटल होती.
मागील आठवड्यातील लासलगाव बाजारातील कांद्याचे सरासरी किमती पाहिले असता फेब्रुवारीच्या मध्यंतरी कांदा बाजारभावात काहीशी सुधारणा झाल्याचे चित्र होतं. मात्र २३ फेब्रुवारी नंतर कांदा दरात घसरण सुरुवात झाली. दोन मार्च रोजी हे बाजार भाव २००० रुपये ते २२०० रुपयांपर्यंत स्थिर होते. त्यानंतर नऊ मार्च रोजी हे बाजार भाव ०२ हजार रुपयांवर येऊन ठेपले.
त्यानंतर १६ मार्च रोजी हे बाजारभाव थेट १५०० रुपयांवर येऊन पोहोचले आहेत आणि सद्यस्थितीत हजार ते चौदाशे रुपयांपर्यंत सरासरी भाव हा कांद्याला मिळतो आहे. काही निवडक बाजारातील दर पाहिले असता लासलगाव बाजारात मागील आठवड्यात सरासरी १५८८ रुपये, सोलापूर बाजारात ११६० रुपये, पिंपळगाव बाजारात १४६३ रुपये, पहिल्या नगर बाजारात केवळ ८०० रुपये तर पुणे बाजारात १२२० रुपये असा दर मिळाला.