Join us
Daily Top 2Weekly Top 5

निम्मा एप्रिल संपला, आज 15 एप्रिल रोजी कांद्याला सरासरी काय दर मिळाले, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 17:30 IST

Kanda Bajarbhav : आज १५ एप्रिल रोजी ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली.

Kanda Bajarbhav : राज्याच्या कांदा बाजार भाव अजूनही सुधारणा नसल्याचे चित्र आहे. आज १५ एप्रिल रोजी ०२ लाख क्विंटलहून अधिक कांदा आवक झाली. यामध्ये सोलापूर मार्केटमध्ये ३४ हजार क्विंटल, नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ९८ हजार क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्यात ११ हजार क्विंटल आवक झाली. 

सोलापूर मार्केट मध्ये लाल कांद्याला केवळ ६०० रुपये असा सरासरी दर मिळाला. येवला मार्केटमध्ये ५५० रुपये, लासलगाव निफाड मार्केटमध्ये ७६१ रुपये, मनमाड मार्केटमध्ये ६५० रुपये, देवळा मार्केटमध्ये ७०० रुपये दर मिळाला.  

तसेच उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड मार्केटमध्ये १०५१ रुपये, येवला मार्केटमध्ये ८५० रुपये, पैठण मार्केटमध्ये ८०० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १२५० रुपये, पारनेर मार्केटमध्ये ८५० रुपये, भुसावळ मार्केटमध्ये ८०० रुपये तर देवळा मार्केटमध्ये ११०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये सरासरी ११०० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये ९५० रुपये, सातारा मार्केटमध्ये ०१ हजार रुपये, पुणे मार्केट मध्ये ८०० रुपये, नागपूर मार्केटमध्ये पांढऱ्या कांद्याला ११५० रुपये असा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/04/2026
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल115293251250925
अमरावतीलालक्विंटल40740016001000
चंद्रपुर---क्विंटल530120014001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2721500900700
छत्रपती संभाजीनगरउन्हाळीक्विंटल15671001025800
धाराशिवलालक्विंटल23300700500
धुळेलालक्विंटल1506300920800
धुळेउन्हाळीक्विंटल17406551100985
जळगावलोकलक्विंटल8500300750650
जळगावलालक्विंटल307595012501110
जळगावउन्हाळीक्विंटल1035001000800
कोल्हापूर---क्विंटल68645001300900
मंबई---क्विंटल823580014001100
नागपूरलालक्विंटल2009110014001275
नागपूरपांढराक्विंटल1640100012001150
नाशिकलालक्विंटल4155262840649
नाशिकउन्हाळीक्विंटल985423341270952
पुणे---क्विंटल16293001250950
पुणेनं. १क्विंटल8343001100800
पुणेलोकलक्विंटल112027001150925
सांगलीलोकलक्विंटल44764001400900
सातारा---क्विंटल21770013001000
साताराहालवाक्विंटल19850014001400
सोलापूरलोकलक्विंटल1743001100800
सोलापूरलालक्विंटल341191001600600
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)205995 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices dip in Maharashtra on April 15: Report

Web Summary : Maharashtra's onion market faces challenges. April 15 saw over 2 lakh quintals arrive. Solapur's red onions averaged ₹600. Lasalgaon's summer onions hit ₹1051, Mumbai's ₹1100. State's total arrival: 205995 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक