Join us

Kanda Bajar Bhav : मध्यप्रदेशपेक्षा महाराष्ट्रात कांद्याला काय दर मिळतोय? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:56 IST

Kanda Bajar Bhav :  देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) उत्पादनांच्या किमतींवरून नाराज आहेत.

Kanda Bajar Bhav : देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) उत्पादनांच्या किमतींवरून नाराज आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी हवालदील झाले आहेत. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना अनेक महिन्यांपासून कांद्याचे योग्य भाव मिळत नाहीत. 

बुधवार, ४ जून रोजी, मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील आलोट मंडीमध्ये कांदा ५० रुपये प्रति क्विंटल म्हणजेच ५० पैसे प्रति किलो दराने विकला गेला. सेंद्रिय कांदे देखील २-३ रुपये प्रति किलो दराने विकले गेले. काल पुन्हा मध्य प्रदेशातील आलोट मंडीमध्ये कांद्याची किमान किंमत ५० रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आली. तर सरासरी किंमत ३४१ रुपये प्रति क्विंटल होती. केवळ बडवाणी बाजारामध्ये कांद्याची जास्तीत जास्त किंमत १५०० रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आली. 

तर महाराष्ट्रात काल ५ जून रोजी भुसावळ बाजारात कमीत कमी ९०० रुपये सरासरी ११०० रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कमीत कमी २०० रुपये सरासरी ६०० रुपये, देवळा बाजारात कमीत कमी १५० रुपये सरासरी १४०० रुपये, कर्जत बाजारात कमीत कमी २०० रुपये, सरासरी ८०० रुपये, पिंपळगाव बाजारात कमीत कमी ६५० रुपये तर सरासरी १५५० रुपये, सोलापूर बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये आणि येवला बाजारात कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला.

तसेच मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) कांद्याच्या उभ्या पिकाचे आणि कापणी केलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित शेतकरी राज्य सरकारकडून भरपाईची मागणी करत आहेत. तसेच, ते नाफेडच्या कांदा खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेशातील बाजारपेठेत कांद्याच्या किमतींची (Kanda Market) स्थितीही वाईट होत चालली आहे

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिकमध्य प्रदेश