Kanda Bajar Bhav : गेल्या दोन महिन्यापसून कांद्याचे दर (Kanda Market) अस्थिर असून दिवसेंदिवस आवक वाढते आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात सारख्या राज्यांच्या बहुतेक बाजारपेठांमध्ये, किमान किंमत दीड रुपये प्रति किलो ते सरासरी ५ ते ७ रुपये प्रति किलो पर्यंत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा वसूल होत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रासह (Maharashtra Kanda Market) मध्यप्रदेश आणि गुजरात (Gujrat Kanda Market) राज्यात काय भाव मिळत आहेत, ते पाहुयात....
गुजरातमधील कांदा बाजारभाव १ मे रोजी गुजरातमधील जेतूर बाजारात कांद्याची (Onion Market Price) सर्वात कमी किंमत नोंदवली गेली. येथे किमान किंमत १५५ रुपये प्रति क्विंटल होती. त्याच वेळी, सुरत बाजार कमाल किमतीच्या बाबतीत पुढे होता, येथे प्रति क्विंटल २००० रुपये कमाल किंमत नोंदवली गेली. तथापि, सर्व बाजारपेठांचा विचार केला तर सरासरी किमती प्रति क्विंटल ६०० ते १३०० रुपयांच्या दरम्यान राहिल्या.
गुजरात राज्यातील चिमनभाई पटेल मार्केटमध्ये कांद्याला क्विंटलमागे कमीत कमी ६०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, तर नाशिकच्या कांद्याला या बाजारात कमीत कमी ९०० रुपये तर सरासरी १३०० रुपये दर मिळाला. तर सुरत बाजारात कमीत कमी ५०० रूपये तर सरासरी १२५० रुपये दर मिळाला.
मध्य प्रदेशातील कांदा बाजारभाव तर दुसरीकडे मध्य प्रदेशात कांद्याची सर्वात कमी किंमत शाजापूर बाजारात नोंदवली गेली. जिथे किमान किंमत २०१ रुपये प्रति क्विंटल नोंदवली गेली, तर सर्वात सर्वाधिक किंमत सारंगपूर बाजारात १२०० रुपये प्रति क्विंटल मिळाली. मध्यप्रदेशातील अलोट बाजारात सरासरी ५०० रुपये दर मिळाला. सारंगपूर बाजारात केवळ ३८५ रुपये असा सरासरी दर मिळाला.
महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव सर्वाधिक कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रातही कांद्याचे भाव फारसे चांगले नाहीत. येथील छत्रपती संभाजी नगर मंडईत किमान भाव ३०० रुपये प्रतिक्विंटल नोंदवला गेला. तर कामठी बाजारात सर्वाधिक किंमत २५०० रुपये प्रति क्विंटल होती. तर महाराष्ट्रामध्ये धाराशिव बाजारात कमीत कमी १००० रुपये तर सरासरी ११५० रुपये, पुणे (पिंपरी) बाजारात सरासरी १३०० रुपये आणि वाई बाजारात कमीत कमी ८०० रुपये तर सरासरी १४०० रुपये दर मिळाला.