Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात

अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात

Latest news Jalgaon pulses reach 35 countries including America, England, Europe, four thousand tons exported every month | अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात

अमेरिका, इंग्लंड, युरोपसह 35 देशांमध्ये जळगावची डाळ पोहचली, दरमहा चार हजार टन निर्यात

Agriculture News : जगभरात जेथे डाळ खाल्ली जाते, त्या देशात जळगावची डाळ पोहोचली आहे.

Agriculture News : जगभरात जेथे डाळ खाल्ली जाते, त्या देशात जळगावची डाळ पोहोचली आहे.

Agriculture News :    देशातील एकूण डाळ उत्पादनात सिंहाचा वाटा असलेल्या जळगावातील डाळ उद्योगात आधुनिकता येऊन येथील डाळी जगभरात पसंतीस उतरल्या आहेत. जगभरात जेथे डाळ खाल्ली जाते, त्या देशात जळगावची डाळ पोहोचली आहे. ही संख्या ३५च्यावर असून, या माध्यमातून ३०० ते ३५० कोटी रुपयांचे विदेशी चलन दर महिन्याला मिळत आहे. जळगावची डाळ 'ग्लोबल' स्तरावर पसंतीस उतल्याने 'लोकल' पातळीवर सात हजार जणांच्या हाताला काम मिळाले आहे.

छगावात दालमिल उद्योग मोठा असून, येथील डाळीला देशाच्या ज असून, ये विविध भागांसह विदेशात मोठी मागणी असते. मध्यंतरी २००६ ते २०१३ या काळातील निर्यातबंदीनंतर डाळ निर्यात पुन्हा सुरू झाली व या उद्योगाने पुन्हा एकदा झेप घेत आपली घोडदौड सुरूच ठेवली. त्यात पाच वर्षांपूर्वी कोरोना संसर्गामुळे डाळ उत्पादनावर परिणाम होऊन डाळीचे उत्पादन निम्म्यावर आले होते. 

तसे पाहता जीवनाश्यक बाब म्हणून लॉकडाऊन काळातही डाळीचे उत्पादन सुरूच होते. मात्र मजुरांची कमतरता, दळणवळणावर बंधने यामुळे डाळ उत्पादनावर परिणाम झाला होता. तो काळ उलटल्यानंतर पुन्हा हा उद्योग पूर्ववत सुरू झाला. येथील डाळींचा दर्जा प्रीमियम असल्याने विदेशात मोठी मागणी असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात होऊन देशाला कोट्यवधींचे विदेशी चलन मिळते.

वर्षाला ५० हजार टन डाळीची निर्यात
जळगावात सुरुवातीला दालफड होत्या. त्यानंतर १९७० मध्ये दालमिलला सुरुवात झाली व येथे संख्या वाढत गेली. जळगावातील डाळीचे वैशिष्ट्ये म्हणजे जास्त मागणी असलेल्या लातूर परिसरातील तुरीचा कच्चा माल म्हणून वापर होण्यासह इतरही सर्वच कडधान्याची निवड निर्यातीच्या दृष्टीने केली जाते. येथील दालमिलमधून दरवर्षी ५० हजार टन डाळीची निर्यात होत असते.

८ हजार क्विंटलवर प्रक्रिया
जळगावातील दालमिलमध्ये दररोज १० हजार क्विंटल कच्च्या मालाची आवश्यकता असते. येथे दररोज आठ हजार क्विंटल डाळीचे उत्पादन होत असते. विदेशात मागणी वाढल्याने रोजगार निर्मितीला मदत होऊन प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सात हजार जणांच्या हाताला काम मिळाले आहे. त्यामुळे दालमिल चालकांच्या कसबमुळे येथील डाळीला जागतिक पातळीवर पसंतीस उतरली व स्थानिक पातळीवर रोजगारदेखील उपलब्ध झाला आहे.

जळगावच्या डाळीला ३५ देशात मागणी :
जळगावातील डाळ अमेरिका, इंग्लंड, युरोपीय राष्ट्रांसह ३५ देशांमध्ये निर्यात होते. दर महिन्याला येथून चार हजार टन डाळ विदेशात निर्यात होत असते. या माध्यमातून दररोज ४० कोटी रुपयांची उलाढाल होत असते.

७० दालमिलमधून सर्वच डाळींची निर्मिती
जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात ७० दालमिल असून, येथील डाळीला पसंती वाढत आहे. जळगावच्या दालमिलमध्ये मूग, उडीद, तूर, हरभरा, मसूर अशा सर्वच प्रकारच्या डाळी तयार होत असतात.

दर्जा, उद्योगातील सचोटी, विश्वासामुळे वेगळी ओळख
जळगावातील डाळ उद्योगात आधुनिकता येऊन येथील डाळी जगभरात पसंतीस उतरल्या आहेत. डाळीचा दर्जा, उद्योगातील सचोटी आणि विश्वास यामुळे जळगावची डाळ निर्यातीत एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. १९९८ व २०००मध्ये जास्तीत जास्त डाळ निर्यात करण्यात यश आले.

त्यावेळी डाळ निर्यातीत देशातून पहिला क्रमांक जळगावातील डाळ उद्योगाला मिळविल्याबद्दल राज्य तसेच केंद्र सरकारकडून पारितोषिक देऊन गौरविले होते. या काळातच ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये येथून डाळ निर्यात होऊ लागली.

Web Title : जलगाँव की दाल 35 देशों में, 4,000 टन का मासिक निर्यात

Web Summary : जलगाँव का दाल उद्योग 35 देशों को निर्यात करता है, जिससे मासिक ₹300-350 करोड़ की आय होती है। वार्षिक निर्यात 50,000 टन तक पहुँचता है, प्रतिदिन 8,000 टन प्रसंस्करण होता है। उच्च गुणवत्ता और विश्वसनीयता वैश्विक मांग को बढ़ाती है, जिससे 7,000 स्थानीय नौकरियाँ पैदा होती हैं।

Web Title : Jalgaon Pulses Reach 35 Countries, Monthly Export of 4,000 Tons

Web Summary : Jalgaon's pulse industry thrives with exports to 35 countries, earning ₹300-350 crore monthly. Annual exports reach 50,000 tons, processing 8,000 tons daily. High quality and reliability drive global demand, creating 7,000 local jobs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.