Soyabean Market : सन २०२५-२६ हंगामासाठी किमान आधारभूत किंमत ५ हजार ३२८ रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. सद्यस्थितीत देखील सोयाबीनच्या किंमती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. जानेवारी महिन्याचे पुढील पंधरा दिवस सोयाबीनचे दर कसे राहतील? ते पाहुयात...
मागील तीन वर्षातील जानेवारी महिन्यातील सरासरी किंमती पाहुयात, यामध्ये जानेवारी २०२३ मध्ये ५ हजार ३९३ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२४ मध्ये ४ हजार ६५९ रुपये प्रति क्विंटल, जानेवारी २०२५ मध्ये ४ हजार १२५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाले.
तर जानेवारी २०२६ मध्ये ४ हजार ३१०ते ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल दर राहण्याची शक्यता आहे. या लातूर बाजारातील सोयाबीनच्या संभाव्य किंमती आहेत. शिवाय सदर संभाव्य किंमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे.
सोयामील निर्यात, सोयाबीन उत्पादन कसे आहे?
सन २०२४-२५ मध्ये सोयामीलच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२०२४मध्ये १९.७ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. सन २०२४-२५ मध्ये निर्यात १७.८० लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे. भारतात सन २०२५-२६ मध्ये सोयाबीनचे उत्पादन १०५ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी कमी आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जानेवारी २०२६ या कालावधीसाठी सोयाबीन पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
