Lokmat Agro >बाजारहाट > Hingoli Bajar Samiti : हळदीची विक्रमी आवक, पावसाचा धोका... बाजार समितीचा 'शेतकरीसाथी' निर्णय!वाचा सविस्तर

Hingoli Bajar Samiti : हळदीची विक्रमी आवक, पावसाचा धोका... बाजार समितीचा 'शेतकरीसाथी' निर्णय!वाचा सविस्तर

latest news Hingoli Bajar Samiti: Record arrival of Halad, threat of rain... Market Committee's 'Shetkari Saathi' decision! Read in detail | Hingoli Bajar Samiti : हळदीची विक्रमी आवक, पावसाचा धोका... बाजार समितीचा 'शेतकरीसाथी' निर्णय!वाचा सविस्तर

Hingoli Bajar Samiti : हळदीची विक्रमी आवक, पावसाचा धोका... बाजार समितीचा 'शेतकरीसाथी' निर्णय!वाचा सविस्तर

Hingoli Bajar Samiti : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे (Shetmal) संरक्षण करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. वाढती आवक लक्षात घेता शेतमाल टिनशेडमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर (Hingoli Bajar Samiti)

Hingoli Bajar Samiti : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे (Shetmal) संरक्षण करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. वाढती आवक लक्षात घेता शेतमाल टिनशेडमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर (Hingoli Bajar Samiti)

शेअर :

Join us
Join usNext

Hingoli Bajar Samiti : हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अधूनमधून अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) जोर कायम असून, यामुळे शेतीसह बाजारपेठांवरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. (Hingoli Bajar Samiti)

अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचा शेतमाल (Shetmal) पावसापासून सुरक्षित राहावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून (APMC) वेळेवर आणि सावधगिरीने पावले उचलली जात आहेत.

शेतमाला टिनशेडमध्ये ठेवणार

* बाजार समितीने यावेळी विशेष दक्षता घेत, विक्रीसाठी येणाऱ्या शेतमाल (Shetmal) थेट टिनशेडखालीच ठेवण्याचे नियोजन केले आहे.

* काही दिवसांपूर्वी आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे ओट्यावर ठेवलेली हळद पावसामुळे भिजली होती आणि दोन-तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आता बाजार समिती (Hingoli Bajar Samiti) अधिक जागरूक झाली आहे.

हळदीची विक्रमी आवक

* संत नामदेव मार्केट यार्डात सध्या हळदीची विक्रमी आवक (Halad Awak) होत असून, २२ मे रोजी तब्बल १ हजार ८९० क्विंटल हळद आली. यामध्ये शेतकऱ्यांना ११ हजार १०० ते १३ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.

* आवक वाढल्याने मोजणी प्रक्रियेला दोन ते तीन दिवस लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मुक्कामी थांबावे लागत आहे.

वेळापत्रकात केला बदल

बाजार समितीने लिलाव वेळापत्रकातही बदल केला असून, शनिवार आणि रविवार लिलाव बंद राहणार आहे. त्यामुळे सोमवारच्या बिटसाठीच हळद आणावी, असे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.

व्यापाऱ्यांना सूचना: शेतकऱ्यांना अडथळा होणार नाही याची दक्षता

शेतमालाची मोकळी जागा व्यापाऱ्यांनी व्यापल्याने काही शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे बाजार समितीने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला शेतमाल वेळेत हलवावा आणि शेतकऱ्यांच्या मालास जागा उपलब्ध करून द्यावी.

भुईमुग, हरभरा आणि तुरीचीही वाढती आवक

* मोंढ्यात सध्या भुईमुगाची आवक वाढत आहे. गुरुवारी (२२ मे) रोजी १ हजार २०० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला असून, त्याला ५ हजार ते ५ हजार ७५० भाव मिळाला.

* तसेच ४०० क्विंटल हरभरा सरासरी ५ हजार ३१५ दराने विकला गेला, तर ७०० क्विंटल तूर विक्रीसाठी आली असून, सरासरी ६ हजार ४५० दर मिळाला.

अवकाळी पावसाच्या संकटात बाजार समितीने शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ती उपाययोजना करून एक सकारात्मक पाऊल उचलले आहे.

टिनशेडखाली शेतमाल सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था, व्यापाऱ्यांना दिलेल्या सूचना आणि शिस्तबद्ध आवक-लिलाव यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होण्यास निश्चितच मदत होईल.

हे ही वाचा सविस्तर : Hingoli Bajar Samiti: हळदीतून सोने काढायचं होतं... पण पावसाने सगळं भिजवलं! वाचा सविस्तर

Web Title: latest news Hingoli Bajar Samiti: Record arrival of Halad, threat of rain... Market Committee's 'Shetkari Saathi' decision! Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.