Harbhara Market : जुलै महिन्याच्या अखेरपासून जोरदार तेजी घेतलेल्या हरभऱ्याच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर प्रति क्विंटल ६ हजार ७०० पर्यंत गेले होते. (Harbhara Market)
मात्र, मागील चार दिवसांपासून सलग दर घसरत असून शुक्रवारी सरासरी कमाल दर ६ हजार २०० प्रति क्विंटल इतकेच राहिले.(Harbhara Market)
दर घसरताच विक्री रोखली
दर घसरू लागल्याने शेतकरी बांधवांनी हरभऱ्याची विक्री तात्पुरती थांबविली आहे. याचा थेट परिणाम बाजारातील आवकेवर झाला असून, वाशिमसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याची आवकही लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
मागणी-पुरवठा असंतुलन कारणीभूत
सध्या बाजारात हरभऱ्याचा पुरवठा मागणीपेक्षा थोडा जास्त झाला होता. त्यातच काही व्यापाऱ्यांनी भाव वाढल्यावर खरेदी मंदावल्याने दरावर दबाव निर्माण झाला.
सध्याचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अजूनही समाधानकारक असले तरी, पूर्वीच्या तुलनेत घसरलेले असल्याने अनेक शेतकरी चांगल्या दराची वाट पाहत आहेत. हवामानातील अनिश्चितता आणि पिकांची स्थिती यामुळे शेतकरी विक्रीबाबत सावध पवित्रा घेत आहेत.
तज्ज्ञ काय सांगतात
दरात चढ-उतार सुरू असल्याने एकदम संपूर्ण साठा विकण्याऐवजी हप्त्यांमध्ये विक्री करावी.
स्थानिक बाजारभाव व राज्यातील सरासरी दर लक्षात ठेवावेत.
हवामानातील बदलामुळे पुढील काही आठवड्यांत दरात पुन्हा सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे काही तज्ज्ञांचे मत.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर