Harbhara Biyane : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान कडधान्य हरभरा पिकाच्या रब्बी २०२५ हंगामामध्ये प्रमाणित बियाणे (वितरण) अंतर्गत अनुदानित विक्री सुरु झाली आहे. १० किलोपासून ते ३० किलोंपर्यंतच्या बॅगा आहेत. ज्या शेतकऱ्यांना हरभरा बियाणे विक्रीचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी कृषी विभागात संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे.
हरभरा दहा वर्षा आतील सर्व वाण :
यामध्ये BG २०२११, PDKV कनक, RVG २०४, फुले विश्वराज, सुपर अन्नेगिरी, JG २४, BG १०२१६, PDKV कांचन (AKG ११०९), फुले, विक्रांत आणि फुले विक्रम या वाणांचा समावेश आहे. आता वरील दिलेल्या वाणांची १० किलोची बॅग ६३० रुपये, २० किलोची बॅग १२६० रुपये, ३० किलोची १८९० रुपयांना मिळणारा आहे.
हरभरा दहा वर्षावरील सर्व वाण :
दिग्विजय, विजय, विशाल, काबुलीमधील विराट, क्रिपा, पिकेव्ही काबुली ०२ या वाणांचा समावेश आहे. तर यामध्ये दिग्विजय, विजय या वाणांची १० किलोची बॅग ६५० रुपये २० किलो ची बॅग १२६० रुपये तर विशाल या वाणाची १० किलोची बॅग ६७० तर २० किलोची बॅग १३०० रुपये आणि काबुलीमधील विराट, क्रिपा पीकेव्ही काबुली ०२ या वाणांची ०५ किलो ची बॅग ४७५ रुपये तर दहा किलोची बॅग ९५० रुपयांना मिळणार आहे.
तरी वरील बाबींचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या महाबीज विक्रेत्यांकडे संपर्क साधावा.
आवश्यक कागदपत्रे : सातबारा ७/१२, आधारकार्ड, ॲग्रीस्टॅक नंबर, मोबाईल नं.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य
प्रति शेतकरी किमान ०.२० हेक्टर ते कमाल १ हेक्टर पर्यंत मर्यादित.
हरभरा जॅकी ९२१८ या वाणास अनुदान नाही.
तसेच अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयात किंवा महाबीज कार्यालयात संपर्क साधावा.