Halad Market : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरतेचा सामना करणाऱ्या हळदीच्या दरात आता पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे.(Halad Market)
केवळ पाच दिवसांच्या कालावधीतच दरात तब्बल ८०० रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटलं आहे.(Halad Market)
३१ ऑक्टोबर रोजी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र ६ नोव्हेंबर रोजी रिसोड बाजार समितीत १४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक नोंदवला गेला. म्हणजेच फक्त पाच दिवसांत दरात ८०० रुपयांची झेप दिसून आली.(Halad Market)
शेतकऱ्यांना दिलासा
जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि उत्पादन खर्चवाढीमुळे आधीच अडचणीत आहेत. सोयाबीनसारख्या मुख्य पिकाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. अशात हळदीच्या दरात आलेली ही वाढ काहीशी दिलासा देणारी ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत होता.
मात्र आता हंगामाच्या अखेरीस दरात सुधारणा झाल्याने नव्या हंगामात चांगल्या भावाची अपेक्षा निर्माण झाली आहे.
उत्पादनावर मुळकुज रोगाचे संकट
या वर्षी वाशिम जिल्ह्यात २५ हजार ३२२ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पोषक हवामानामुळे पिके बहरली होती, पण सप्टेंबरमध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पिकावर मुळकुज रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोणत्या हळदीला किती दर?
| हळदीचा प्रकार | किमान दर (₹/क्विंटल) | कमाल दर (₹/क्विंटल) |
|---|---|---|
| कान्डी हळद | ११,००० | १४,२०० |
| गहू हळद | १०,९०० | १३,१५० |
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : दरवाढीने दिलासा; हळदीने वाशिम बाजारात गाठली नवी शिखरे
