Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

latest news Halad Market: Halad market is declining; Read the reason in detail | Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market)

Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market)

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market :  राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत.(Halad Market)

महिनाभरापूर्वी १४ हजारांचा उच्चांक गाठलेली हळद आता सतत घसरत असून, शेतकरी विक्री रोखून धरत आहेत. (Halad Market)

हळदीच्या बाजारभावात मोठे बदल होताना दिसत आहेत. फक्त आठ दिवसांतच भाव दीड हजारांनी कोसळून प्रतिक्विंटल ११ हजार ७०५ रुपयांवर आला आहे. महिनाभरापूर्वी १४ हजार रुपये असलेला दर आता सतत खाली जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. (Halad Market)

दरात सुधारणा होत नसल्याने अनेकांनी विक्री रोखून धरली असून बाजारातील हळदीची आवक घटत चालली आहे.(Halad Market)

वसमत मधील मोंढा बाजारात हळदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. (Halad Market)

गुरुवारी बिटात प्रतिक्विंटल भाव तब्बल दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये इतका झाला. आठ दिवसांपूर्वीच हाच भाव १३ हजार ५०० रुपये होता, तर महिनाभरापूर्वी १४ हजार रुपयांचा उच्चांक गाठला होता. दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.(Halad Market)

हंगामाच्या सुरुवातीला चांगले भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता; मात्र सध्या बाजारातील मागणी कमी आणि आवक नियमित असल्याने दर घसरत आहेत.

मागील १५ दिवसांपासून वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळदीचे दर स्थिर आहेत. गुरुवारी रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांडी हळदीला किमान १० हजार ५०० ते १२ हजार रुपये प्रती क्विंटल, तर गडू हळदीला १० हजार १०० ते ११ हजार ३०० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला.

दरात सुधारणा होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी विक्री रोखून धरली आहे. परिणामी आवक कमी होत असून, गुरुवारी रिसोड बाजार समितीत केवळ २ हजार ३४० क्विंटल हळदीची आवक झाली.

काय आहे कारण ?

मागणी कमी, आवक नियमित आणि निर्यातीत मंदी ही घसरणीची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

जर भावात लवकर सुधारणा झाली नाही, तर पुढील काही दिवसांत हळदीची विक्री आणखी कमी होईल, ज्याचा थेट परिणाम बाजारातील उपलब्धतेवर आणि खरेदीदारांच्या दरावर होईल, असे जाणकार सांगतात.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीच्या दरात घसरण; तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही शेतकऱ्यांना फटका

Web Title: latest news Halad Market: Halad market is declining; Read the reason in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.