Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

latest news Halad Market: Halad like gold has no value; Market slowdown due to war | Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

Halad Market : सोन्यासारख्या हळदीला भाव नाही; युद्धामुळे बाजारात मंदी

Halad Market : आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने हळदीचे भाव घसरले आहेत. (Halad Market)

Halad Market : आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने हळदीचे भाव घसरले आहेत. (Halad Market)

Halad Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या हंगामातील हळदीची आवक सुरू झाली असली तरी बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Market)

आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली असून त्याचा थेट परिणाम हळदीच्या दरावर दिसून येत आहे. सध्या बाजारात हळदीचे भाव घसरल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत.(Halad Market)

हंगामाच्या सुरुवातीलाच कमी दर

सध्या हिंगोली बाजार समितीत नव्या हळदीची आवक सुरू झाली असून दररोज साधारण १ ते १.५ हजार क्विंटल हळद विक्रीसाठी येत आहे.

या आवकेत नव्या हळदीसोबतच काही प्रमाणात मागील हंगामातील जुन्या हळदीचाही समावेश आहे.

सध्या हळदीला सरासरी १३,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र हा दर मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याने शेतकरी निराश झाले आहेत.

मागील वर्षी हळदीला चांगला दर मिळाल्याने यंदाही चांगल्या भावाची अपेक्षा होती, परंतु हंगामाच्या सुरुवातीलाच दर घसरल्याचे चित्र आहे.

युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापारी सावध

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापारी सध्या मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास टाळाटाळ करत आहेत.

बाजारातील अनिश्चिततेमुळे व्यापारी सावध पवित्रा घेत असल्याने हळदीच्या दरावर दबाव येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

युद्धविराम झाला नाही आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती अशीच राहिली तर पुढील काही दिवसांत हळदीचे दर आणखी घसरण्याची शक्यता असल्याचेही बाजारातील जाणकारांचे मत आहे.

शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देत शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने हळद पिकवली आहे. उत्पादन खर्चही वाढत असताना हळदीला अपेक्षित दर न मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

सरकारने हस्तक्षेप करावा

हिंगोली तालुक्यातील शेतकरी नंदू कन्हाळे म्हणाले की, 'निसर्गाच्या लहरीपणातून वाचवून पिकवलेल्या सोन्यासारख्या हळदीला आता युद्धाच्या झळा बसू लागल्या आहेत. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी सरकारने हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात.'

पुढील काळावर नजर

सध्या हंगामाची सुरुवात असल्याने पुढील काही आठवड्यांत बाजारात हळदीची आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मात्र दरातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल का, याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे हिंगोलीसह मराठवाड्यातील हळद उत्पादक शेतकरी सध्या बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

हे ही वाचा सविस्तर :Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

अधिक वाचा :Tur Kharedi : तूर खरेदीचा वेग वाढणार का? दीड महिन्यात साडेतीन टक्केच खरेदी

Web Title : युद्ध के कारण हल्दी बाजार में मंदी, कम दाम

Web Summary : युद्ध की आशंकाओं के बीच हिंगोली के हल्दी बाजार में कीमतें गिरीं। किसानों को चिंता, दरें ₹13,500/क्विंटल तक पहुंचीं। व्यापारियों की सावधानी, और गिरावट का डर। किसानों ने उचित मूल्य के लिए सरकारी हस्तक्षेप का आग्रह किया।

Web Title : Turmeric Market Faces Downturn Due to War, Low Prices

Web Summary : Hingoli's turmeric market sees low prices amid war concerns. Farmers worry as rates fall to ₹13,500/quintal. Traders are cautious, fearing further drops. Farmers urge government intervention for fair prices.