Halad Market : वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात सोमवारी (१० नोव्हेंबर) रोजी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या हळदीला तब्बल प्रति क्विंटल १७ हजार रुपये असा विक्रमी भाव मिळाला. मागील पाच महिन्यांपासून भाव स्थिर असतानाच झालेल्या या झळाळीने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.(Halad Market)
वसमत तालुका हळदीच्या उत्पादनात ओळखला जातो. गेल्या काही महिन्यांपासून हळदीचे दर १२ ते १३ हजार रुपयांदरम्यान स्थिर होते. परंतु सोमवारच्या लिलावात भावात झालेली झेप शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली. (Halad Market)
या दिवशी बाजार समितीच्या मोंढ्यात सुमारे साडेतीन हजार कट्टे हळदीची आवक झाली होती. त्यापैकी उत्तम प्रतीच्या हळदीला प्रति क्विंटल १७ हजारांचा दर मिळाला, तर मध्यम प्रतीच्या हळदीला १४ हजार ५०० रुपये एवढा सरासरी भाव मिळाला.(Halad Market)
हळदीचा दर्जा, रंग आणि ओलसरपणा यावर दर ठरवले जातात. यंदा पिकाची गुणवत्ता चांगली असल्याने बाजारात स्पर्धात्मक लिलाव पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, हळदीच्या दर्जेदार मालालाही १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.(Halad Market)
गेल्या सहा महिन्यांपासून हळदीचे दर स्थिर होते. अचानक झालेली ही वाढ बाजारातील मागणी वाढल्याचे संकेत देते. निर्यातीसाठीचा मागास पुन्हा वाढू लागल्याने आगामी काळात हळदीचे दर आणखी चांगले राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Halad Market)
दोन वर्षांच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर आज मिळालेला हा भाव म्हणजे हळदी उत्पादकांसाठी दिलासा आहे. पुढेही दर टिकले, तर हंगाम फायदेशीर ठरेल.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीला आला भाव! ५ दिवसांत 'इतक्या' रुपयांची वाढ वाचा सविस्तर
