Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : हळदीच्या दरात घसरण; तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही शेतकऱ्यांना फटका

Halad Market : हळदीच्या दरात घसरण; तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही शेतकऱ्यांना फटका

latest news Halad Market: Fall in halad prices; Farmers waiting even after three months | Halad Market : हळदीच्या दरात घसरण; तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही शेतकऱ्यांना फटका

Halad Market : हळदीच्या दरात घसरण; तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही शेतकऱ्यांना फटका

Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले आहेत. (Halad Market)

Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले आहेत. (Halad Market)

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market : हळद उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसला आहे. हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षीपेक्षा यंदा हळदीच्या सरासरी दरात मोठी घसरण झाली असून मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे दर खाली आले. (Halad Market) 

तीन-चार महिने साठा करून भाववाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी आता केवळ निराशा आली आहे. त्यामुळे हळदीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.(Halad Market)

मराठवाडा व विदर्भात हळद उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा अपेक्षित दर न मिळाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

हिंगोलीच्या संत नामदेव मार्केट यार्डात गेल्या वर्षी सरासरी १४ ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटलने विकली जाणारी हळद यंदा १३ हजार रुपयेही पार करू शकलेली नाही. परिणामी, तीन-चार महिने साठा करून दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी आता केवळ निराशा आली आहे.(Halad Market)

चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही दर वाढले नाहीत

मार्च-एप्रिलमध्ये हाती आलेले हळदीचे उत्पादन भाव वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवले. मात्र चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही बाजारात दरात वाढ झाली नाही. उलट आर्थिक गरजेपोटी शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात हळद बाजारात विक्रीस आणल्याने हळदीची आवक वाढली आणि दरात आणखी घसरण झाली.

२२ जुलै रोजी संत नामदेव मार्केट यार्डात तब्बल २ हजार ३०० क्विंटल हळदीची आवक झाली. मात्र, मागणी कमी व पुरवठा जास्त असल्यामुळे व्यापाऱ्यांनी हळदीसाठी जास्तीचा दर देण्यास नकार दिला.

व्यवहार पुढील सूचनेपर्यंत बंद

संत नामदेव मार्केट यार्डातील हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार २३ जुलैपासून पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. २२ जुलै रोजी विक्रीस आलेल्या हळदीचे बीट व मोजमाप बुधवारी करण्यात येणार असून गुरुवारी अमावस्येनिमित्त मोंढा व मार्केट यार्डही बंद राहणार असल्याचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

हळद दर पुन्हा वाढतील का याची कोणतीही खात्री नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. हळद विकावी की आणखी काही दिवस थांबावे, याचा निर्णय न घेता आल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत.

२२ जुलै रोजी मोंढ्यात विक्रीस आलेला शेतमाल आणि सरासरी दर

शेतमालआवक (क्विंटलमध्ये)सरासरी दर (रुपये/क्विंटल)
गहू८०२,७५०
ज्वारी१००१,९१५
हरभरा२००६,१२७
सोयाबीन४१८७४,००० (३२००–४४०० दरम्यान)
हळद२३००११,३५०

सोयाबीनच्या दरातही समाधान नाही

गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीन उत्पादकांनाही समाधानकारक दर मिळालेला नाही. मोंढ्यात आवक मंदावली असून सरासरी ४०० ते ५०० क्विंटल आवक होत आहे. दर मात्र ३ हजार २०० ते ४ हजार ४०० रुपयांदरम्यानच अडकले आहेत.

शेतकरी संघटनांनी बाजार समितीकडे व शासनाकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केली असून हळद व सोयाबीन उत्पादकांना न्याय मिळावा अशी आशा व्यक्त केली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Market : कापसाच्या दरात काहीशी नरमाई; काय आहे कारण वाचा सविस्तर

Web Title: latest news Halad Market: Fall in halad prices; Farmers waiting even after three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.