Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून 'पिवळे सोने' मुक्त करा; शेतकऱ्यांची मागणी वाचा सविस्तर

Halad Market : 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून 'पिवळे सोने' मुक्त करा; शेतकऱ्यांची मागणी वाचा सविस्तर

latest news Halad Market: Exclude Halad from NCDX futures market; Read farmers' demand in detail | Halad Market : 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून 'पिवळे सोने' मुक्त करा; शेतकऱ्यांची मागणी वाचा सविस्तर

Halad Market : 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून 'पिवळे सोने' मुक्त करा; शेतकऱ्यांची मागणी वाचा सविस्तर

Halad Market : हळदीच्या भावातील सततच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही वैतागले आहेत. हिंगोली व वसमत तालुक्यात शेतकऱ्यांनी वायदा बाजारातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ संप पुकारला असून, एनसीडीएक्स (NCDX) वायदा बाजारातून हळदी वगळण्याची मागणी जोर धरत आहे.

Halad Market : हळदीच्या भावातील सततच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही वैतागले आहेत. हिंगोली व वसमत तालुक्यात शेतकऱ्यांनी वायदा बाजारातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ संप पुकारला असून, एनसीडीएक्स (NCDX) वायदा बाजारातून हळदी वगळण्याची मागणी जोर धरत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Halad Market : हळदीच्या भावातील सततच्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही वैतागले आहेत. हिंगोली व वसमत तालुक्यात शेतकऱ्यांनी वायदा बाजारातील गैरव्यवहाराच्या निषेधार्थ संप पुकारला असून, एनसीडीएक्स (NCDX) वायदा बाजारातून हळदी वगळण्याची मागणी जोर धरत आहे. (Halad Market)

अलीकडच्या काळात हळदीचे भाव बेभरवशाचे झाले आहेत. काही वेळा समाधानकारक भाव मिळातो, तर काही वेळा पडत्या दरात हळद विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. (Halad Market)

परिणामी, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसतो. त्यामुळे हळद पिकाला वायदे बाजारातून वगळण्यात यावे, अशी मागणी जोर धरत असून, त्यासाठी 'एनसीडीएक्स'च्या सीईओंना निवेदन देण्यात आले आहे. (Halad Market)

हिंगोलीत २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान व्यापाऱ्यांनी बंदचा इशारा दिला आहे, तर वसमत येथे २० ऑगस्टपासून हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद आहेत. (Halad Market)

हळदीचा समावेश नॅशनल कमोडिटी अँड डेरिवेटिव्हज एक्सर्जेज लिमिटेडच्या (NCDX) वायदा बाजारात केला जातो. (Halad Market)

वायदा बाजारामुळे शेतमालाच्या किमतीत स्थिरता येईल आणि शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्ष परिस्थिती उलट आहे.  (Halad Market)

वायदा बाजारात मोठे व्यापारी आणि सट्टेबाज कृत्रिमरित्या हळदीच्या किमतीत वाढ किंवा घट घडवून आणत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.  (Halad Market)

जेव्हा किमती कृत्रिमरित्या वाढतात, तेव्हा शेतकरी चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतीमाल साठवून ठेवतात. परंतु, हे भाव अचानक कोसळतात तेव्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

तेव्हा हळदीला 'एनसीडीएक्स'च्या वायदा बाजारातून वगळणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी बाजार समितीच्या वतीने करण्यात आली.

'एनसीडीएक्स'च्या गोदामामध्ये कमी दर्जाची हळद

कमी दर्जाची हळद साठवून ठेवली आहे आणि तिचा वापर बाजारभावात फेरफार करण्यासाठी केला. अशा काही गंभीर तक्रारीनंतर 'एनसीडीएक्स' चे अधिकारी तपास करत असल्याची माहिती आहे. 

हा प्रकार तेलंगणा राज्यातील निजामाबादमध्ये घडला आहे. ते इतरत्र घडू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचेच आर्थिक नुकसान होत नाही तर कृषी व्यापारी व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरही परिणाम होत आहे.

जे निजामाबादमध्ये घडले ते वसमतमध्ये घडू नये

वसमत येथे २०२४-२५ मध्ये हळद या शेतमालाची आवक ३ लाख विंवटल झाली. २०२५-२६ मध्ये हळद या पिकाचे क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे अंदाजे ४ ते ५ लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे.

तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील गोडाऊनमध्ये दुसऱ्या राज्याच्या हळदीचा साठा करून निजामाबादची हळद असल्याचा कागदोपत्री खेळ करण्यात आला. 

हा प्रकार समोर आला असल्यामुळे सर्वत्र सावध पवित्रा घेतला जात आहे. जे निजामाबादमध्ये घडले ते वसमतमध्ये नाकारता येऊ शकत नाही.

हिंगोली, वसमत येथील मोंढा बंद

हिंगोली व वसमत आडत व्यापारी हळद व्यापारी असोसिएशन मार्केट यार्ड वसमत व तालुक्यातील शेतकऱ्यांनी १९ ऑगस्ट रोजी बाजार समिती प्रशासनास मोंढा बंदसंदर्भात निवेदन दिले.

हळद वायदे बाजारमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी सर्व हळद व्यापारी, शेतकऱ्यांनी संप पुकारला आसल्याचे निवेदनात नमूद केले

शेतकऱ्यांच्या निषेधाचे कारण

* प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही.

* भाव कृत्रिमरित्या वाढले किंवा कोसळले, यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

* हळदी पिकासाठी स्थिर दराची आवश्यकता आहे, जी वायदा बाजार सध्या पुरवत नाही.

हे ही वाचा सविस्तर : Kanda Market : कांद्याच्या आवकेत चढ-उतार; 'या' बाजारात दर सुधारले वाचा सविस्तर

Web Title: latest news Halad Market: Exclude Halad from NCDX futures market; Read farmers' demand in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.