Halad Market : खरीप हंगाम सुरू होत असतानाच हळदीच्या बाजारभावाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. मागील आठवड्यापासून मोंढा बाजारात हळद विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर शेतकरी दाखल होत आहेत, मात्र त्याला समाधानकारक दर मिळत नाहीत. (Halad Market)
परिणामी, 'हळद घरीच ठेवावी लागेल की काय?' असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. आगामी काळात तरी हळदीला योग्य दर मिळतील की नाही याबाबत शेतकरी सध्या संभ्रमात आहेत.(Halad Market)
हळदीचे सध्याचे दर
एकूण आवक (३० जून): ५,००० कट्टे
दर्जेदार हळदीस भाव: १३,३५५ रु. क्विंटल
सरासरी बाजारभाव: ११,९३९ रु. क्विंटल
हळद उत्पादनात घट; तरीही दरात वाढ नाही!
यावर्षी पावसाचे प्रमाण अनिश्चित असल्याने हळदीच्या उत्पादनात घट होणार असल्याचे संकेत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी काळ्या पाण्यावर हळदीची लागवड केली असून काही भागांमध्ये हळदीचे पीक चांगले डोलत आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हळद अजून बाहेरच आलेली नाही.
शेतकऱ्यांना यंदा हळदीचे दर वाढतील अशी आशा होती, परंतु बाजारात सध्याचे दर समाधानकारक नसल्याने हळद विकावी की नाही, यावर संभ्रम निर्माण झाला आहे.
दर स्थिर असल्याने शेतकरी 'वेट अँड वॉच' पद्धती
जर पावसाचे प्रमाण लवकर सुधारले आणि आवक कमी झाली, तर हळदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता.
स्थानिक व्यापारी देखील दर्जावर आधारित भाव ठरवत असल्याने सध्या फक्त उत्कृष्ट प्रतीच्या हळदीलाच चांगले दर मिळत आहेत.
'पिवळं सोनं' अशी ओळख असलेल्या हळदीला यंदा बाजारात त्यामानाने अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
हे ही वाचा सविस्तर : Tur bajar bhav : पांढऱ्या तुरीला 'या' बाजारात सर्वाधिक दर वाचा सविस्तर