Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले

Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले

latest news Halad Market: Big twist in the turmeric market; Farmers' calculations went wrong in one day | Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले

Halad Market : हळदीच्या बाजारात मोठा ट्विस्ट; एका दिवसात शेतकऱ्यांचे गणित बिघडले

Halad Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची विक्रमी ६,७०० क्विंटल आवक झाल्यानंतर कोच्या हळदीच्या दरात अवघ्या एका दिवसात प्रतिक्विंटल १,३०० रुपयांची घसरण झाली आहे. अचानक वाढलेल्या आवकेमुळे बाजार समितीत गर्दी वाढली असून, दर घसरल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Market)

Halad Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची विक्रमी ६,७०० क्विंटल आवक झाल्यानंतर कोच्या हळदीच्या दरात अवघ्या एका दिवसात प्रतिक्विंटल १,३०० रुपयांची घसरण झाली आहे. अचानक वाढलेल्या आवकेमुळे बाजार समितीत गर्दी वाढली असून, दर घसरल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Market)

वाशिम : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची विक्रमी आवक झाल्यानंतर कोच्या हळदीच्या दरात अवघ्या एका दिवसात प्रतिक्विंटल तब्बल १ हजार ३०० रुपयांची घसरण झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Halad Market)

११ मे रोजी बाजार समितीत हळदीची तब्बल ६ हजार ७०० क्विंटल आवक नोंदविण्यात आली.(Halad Market)

वाढलेल्या आवकेमुळे संपूर्ण हळदीची मोजणी आणि हर्रासी प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे शिल्लक राहिलेल्या हळदीचा व्यवहार १२ मे रोजी करण्यात आला. मात्र, दुसऱ्याच दिवशी दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला.(Halad Market)

एका दिवसात मोठी दर घसरण

११ मे रोजी वाशिम बाजार समितीत कोच्या हळदीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्या दिवशी कोच्या हळदीला प्रतिक्विंटल किमान १७ हजार २५० रुपये तर कमाल २२ हजार ३०० रुपये दर मिळाला होता. कान्डी आणि गट्टू हळदीच्या तुलनेत कोच्या हळदीला अधिक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १२ मे रोजी शिल्लक राहिलेल्या हळदीची हर्रासी करण्यात आली असता दरात मोठी घसरण झाली. त्या दिवशी कोच्या हळदीला किमान १७ हजार ५० रुपये तर कमाल २१ हजार रुपये दर मिळाला. परिणामी अवघ्या एका दिवसात कमाल दरात १ हजार ३०० रुपयांची घट झाली.

या अचानक घसरलेल्या दरामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत बाजार व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विक्रमी आवकेमुळे बाजार समितीत गर्दी

वाशिम बाजार समितीत नियमितपणे दर शुक्रवारी हळदीची हर्रासी होत असते. मात्र, सलग दोन शुक्रवारी सुटी आल्यामुळे विक्री प्रक्रियेत मोठा खंड पडला होता. त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने विशेष बाब म्हणून सोमवारी (दि. ११) हळद विक्रीस परवानगी दिली.

दीर्घ प्रतीक्षेनंतर विक्री सुरू झाल्याने जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळद बाजार समितीत आणली. शनिवारी सायंकाळपासूनच ट्रॅक्टर, पिकअप आणि मालवाहू वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत बाजार समितीत हळदीची मोठ्या प्रमाणात आवक झाली.

मोजणीसाठी आणखी एक दिवस

अचानक वाढलेल्या आवकेमुळे प्रशासनाची मोठी दमछाक झाली. दिवसभरात केवळ ६० टक्के हर्रासी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली, तर उर्वरित ४० टक्के हळदीची मोजणी आणि लिलाव प्रक्रिया पुढील दिवशी सुरू ठेवावी लागली.

सध्या बाजार समिती परिसरातील दोन डोम आणि दहा ओट्यांवर हळदीची पोती साचून राहिली आहेत. त्यापैकी केवळ पाच ओट्यांवरील हळदीची हर्रासी पूर्ण झाली असून उर्वरित हळदीसाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय

इतर बाजार समित्यांच्या तुलनेत वाशिम बाजार समितीत हळदीला तुलनेने चांगला दर मिळत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी येथे विक्रीसाठी येतात. मात्र, सलग दोन आठवडे हर्रासी न झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

अनेक शेतकरी शनिवारपासूनच बाजार समितीत मुक्काम ठोकून होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, अपुरी जागा आणि वाढलेली गर्दी यामुळे बाजार परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

अचानक आवक वाढल्याचा परिणाम?

दरातील घसरणीमागे अचानक वाढलेली आवक हे प्रमुख कारण असल्याचे व्यापारी आणि बाजार समितीतील सूत्रांकडून सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात माल बाजारात दाखल झाल्याने खरेदीदारांनी कमी दराने बोली लावल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, शेतकऱ्यांच्या मते दरातील इतकी मोठी घसरण अन्यायकारक असून बाजार समिती प्रशासनाने पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे.

शेतकऱ्यांमध्ये चिंता

हळद हे रोख पीक मानले जाते. उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाजारात दरातील अचानक चढ-उतारामुळे शेतकरी चिंतेत आहेत. एकाच दिवसात हजारो रुपयांचा फटका बसल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

आता आगामी दिवसांत आवक आणि मागणीच्या परिस्थितीनुसार हळदीचे दर कसे राहतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Tur Market : वाशिमची तूर थेट दिल्ली बाजारात; शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळाला मोठा नफा

अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

Web Title : हल्दी बाजार में झटका: अचानक कीमत गिरने से किसानों का गणित बिगड़ा।

Web Summary : वाशिम के हल्दी बाजार में बड़ा उलटफेर हुआ क्योंकि 6,700 क्विंटल की रिकॉर्ड आवक के बाद कीमतों में एक ही दिन में ₹1,300 प्रति क्विंटल की गिरावट आई। किसान अप्रत्याशित नुकसान से परेशान हैं, बाजार प्रबंधन पर सवाल उठा रहे हैं।

Web Title : Turmeric Market Shock: Farmers' calculations upset by sudden price drop.

Web Summary : Washim's turmeric market saw a huge twist as prices plummeted by ₹1,300 per quintal in a single day after a record arrival of 6,700 quintals. Farmers are upset because of the unexpected loss, questioning the market management.