रिसोड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मंगळवार, (दि. १९) मे रोजी सकाळी ११ वाजता केवळ शिल्लक राहिलेल्या हळदीच्या मालाचाच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे.(Halad Market)
या दिवशी इतर कोणत्याही शेतमालाचा लिलाव होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना त्यानुसार नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Halad Market)
बाजार समितीच्या सूचनेनुसार, सोमवारी आलेल्या हळदीच्या मालापैकी काही मालाचा लिलाव अपूर्ण राहिला होता. त्यामुळे मंगळवारी फक्त त्याच शिल्लक मालाचा लिलाव पूर्ण करण्यात येणार आहे.
यासाठी सकाळी ११ वाजल्यापासून लिलाव प्रक्रिया सुरू होणार असून, संबंधित व्यापारी, अडते आणि शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची सूचना देत नवीन हळदीचा कोणताही माल बाजार आवारात आणू नये, असे स्पष्ट केले आहे.
नवीन माल स्वीकारला जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी अनावश्यक वाहतूक खर्च टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे बाजारातील गर्दी नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार असून, प्रलंबित व्यवहार सुरळीत पूर्ण करता येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच लिलाव प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी बाजार समितीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
बाजार समितीने ही सूचना शेतकरी, अडते, खरेदीदार, हमाल आणि मापारी बांधवांसाठी जाहीर केली असून, सर्व संबंधितांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुढील नियमित लिलावाबाबतची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचेही बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
Web Summary : Risod Market Committee will auction only remaining turmeric stock on May 19th. No other produce will be auctioned. Farmers are advised not to bring fresh turmeric to avoid unnecessary transport costs. This decision aims to manage crowds and streamline pending transactions.
Web Summary : रिसोड बाजार समिति 19 मई को केवल शेष हल्दी स्टॉक की नीलामी करेगी। कोई अन्य उपज नीलाम नहीं की जाएगी। किसानों को अनावश्यक परिवहन लागत से बचने के लिए ताजा हल्दी नहीं लाने की सलाह दी जाती है। इस निर्णय का उद्देश्य भीड़ का प्रबंधन करना और लंबित लेनदेन को सुव्यवस्थित करना है।