Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

latest news Halad Export: Impact of war on turmeric market; Thousands of tons of goods stuck at the port Read in detail | Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

Halad Export : युद्धाचा हळद बाजारावर परिणाम; हजारो टन माल बंदरात अडकला वाचा सविस्तर

Halad Export : हळदीचा हंगाम सुरू असतानाच आखाती देशांतील तणावाचा फटका बाजाराला बसला आहे. निर्यात ठप्प झाल्यामुळे दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.(Halad Export)

Halad Export : हळदीचा हंगाम सुरू असतानाच आखाती देशांतील तणावाचा फटका बाजाराला बसला आहे. निर्यात ठप्प झाल्यामुळे दरात मोठी घसरण झाली असून शेतकरी आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत.(Halad Export)

Halad Export : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता हळद बाजारालाही बसू लागला आहे. (Halad Export)

कतार, दुबई आणि इराणसारख्या देशांकडे होणारी हळदीची निर्यात अचानक ठप्प झाल्याने वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. (Halad Export)

ऐन हंगामात दर कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडले असून व्यापारी वर्गातही चिंता व्यक्त केली जात आहे.

यंदा हळदीचा हंगाम सुमारे दीड महिन्यांपूर्वी सुरू झाला. सुरुवातीला बाजारात हळदीची आवक चांगली असून दरही समाधानकारक मिळत होते. हळदीचे उत्पादनही समाधानकारक झाले असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चांगल्या नफ्याची अपेक्षा होती.

आखाती देशांतील तणाव निर्माण होण्यापूर्वी गेल्या आठवड्यात हळदीला प्रतवारीनुसार प्रति क्विंटल १४,५०० ते १६,६०० रुपये इतका दर मिळत होता.

मात्र सध्याच्या परिस्थितीत हळदीच्या दरात अचानक सुमारे तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे. निर्यातीचे मार्ग बंद झाल्यामुळे बाजारातील मागणी कमी झाली असून त्याचा थेट परिणाम दरांवर होत असल्याचे दिसून येत आहे.

निर्यात विस्कळीत; हजारो टन हळद अडकली

आखाती देशांमधील युद्धस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय जलमार्ग विस्कळीत झाले आहेत. परिणामी निर्यातीसाठी तयार असलेली सुमारे एक हजार टन हळद मुंबईच्या जेएनपीटी बंदरात अडकून पडली असल्याची माहिती व्यापारी वर्तुळातून मिळत आहे. यामुळे व्यापाऱ्यांसोबतच शेतकऱ्यांचाही जीव टांगणीला लागला आहे.

युद्धस्थिती किती काळ टिकते आणि निर्यात पुन्हा कधी सुरू होते, यावर हळद व्यापाराचे भवितव्य अवलंबून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. निर्यात ठप्प झाल्याने बाजारातील व्यवहारांवरही मोठा परिणाम होत आहे.

बाजारातील दर घसरले

जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्येही हळदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. २६ फेब्रुवारी रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल १५,७८० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला होता.

मात्र ५ मार्च रोजी हळदीला किमान १२,००० ते कमाल १३,४२५ रुपये प्रति क्विंटल इतकाच दर मिळाला. त्याचप्रमाणे वाशिम बाजार समितीत शुक्रवारी हळदीला सुमारे १३,३२५ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

दरातील या घसरणीमुळे शेतकरी चिंतेत असून ऐन हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने आर्थिक अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पुढील काळात आखाती देशांतील परिस्थिती सुधारली आणि निर्यात पुन्हा सुरू झाली तर हळदीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Onion Export : कंटेनर रवाना झाला, पण अचानक मध्यपूर्वेत तणाव; कांदा निर्यातीवर ब्रेक वाचा सविस्तर

अधिक वाचा : Halad Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये 'पिवळ्या सोन्या'चा श्रीगणेशा; जाणून घ्या कसा मिळाला दर

Web Title : युद्ध का हल्दी निर्यात पर असर; हजारों टन माल बंदरगाह पर अटका

Web Summary : खाड़ी देशों में तनाव से हल्दी का निर्यात रुका, वाशिम में कीमतें गिरीं। हजारों टन माल मुंबई बंदरगाह पर फंसा। किसानों को नुकसान, भविष्य संघर्ष और निर्यात की बहाली पर निर्भर। बाजार पर बड़ा असर।

Web Title : War Impacts Turmeric Exports; Thousands of Tons Stuck at Port

Web Summary : Gulf tensions halt turmeric exports, causing prices to plummet in Washim. Farmers face losses as thousands of tons are stuck at Mumbai port. The future depends on the conflict's duration and export resumption. Market transactions are significantly affected.