Halad Bajarbhav : मराठी नववर्ष आणि गुढीपाडवाचा शुभ मुहूर्त यंदा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष लाभदायक ठरला आहे.(Halad Bajarbhav)
'पिवळं सोनं' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीला या दिवशी तब्बल १५ हजार रुपये प्रति क्विंटल असा विक्रमी दर मिळाल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी पाहायला मिळाली.(Halad Bajarbhav)
बाजारात हळदीला जोरदार मागणी
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत गुढीपाडव्याच्या दिवशी हळदीची मोठ्या प्रमाणावर आवक झाली.
कमाल दर: १५,००१ रुपये/क्विंटल
किमान दर: १२,८२१ रुपये/क्विंटल
सरासरी दर: १३,३९१ रुपये/क्विंटल
गतवर्षी याच मुहूर्तावर हळदीला सुमारे १३,९०० रुपये दर मिळाला होता. त्या तुलनेत यंदा दरात लक्षणीय वाढ झाल्याने शेतकरी आनंदी आहेत.
विक्रमी व्यवहार; शेतकऱ्यांना दिलासा
गुढीपाडव्याच्या शुभदिनी शेतकरी भुजंगराव रोडगीकर यांच्या हळदीला सर्वाधिक १५,००१ रुपयांचा दर मिळाला. हा माल श्रीकृष्ण इंटरप्रायजेस यांनी खरेदी केला.
दिवसभरात सुमारे ४,५०० कट्ट्यांची खरेदी-विक्री झाली, ज्यामुळे बाजारात चांगली उलाढाल झाली.
हळद लागवड क्षेत्रात मोठी वाढ
यंदा नांदेड जिल्ह्यात हळद लागवडीत मोठी वाढ झाली आहे.
एकूण क्षेत्र: २५,६२८ हेक्टर
सध्या काढणीला वेग असून उताराही समाधानकारक
बाजारात आवक वाढत असून पुढील काळात दर वाढण्याची शक्यता
काही शेतकऱ्यांनी सध्याचा चांगला दर असूनही भविष्यात आणखी दर वाढतील, या अपेक्षेने हळद विक्री थांबवली आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधान, पण अपेक्षा कायम
सध्याचे दर समाधानकारक असले तरी बाजारातील मागणी आणि कमी पुरवठा लक्षात घेता हळदीचे दर आणखी वाढतील, असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
गुढीपाडव्याचे इतर शेतमाल दर
गहू : २,६९१ रु.
ज्वारी : २,६८१ रु.
तूर : ६,८०१ रु.
हळद : ४,९३१ ते १५,००१ रु.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हळदीला मिळालेला विक्रमी दर हा नांदेडच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला असून, 'पिवळ्या सोन्या'ने यंदा खऱ्या अर्थाने झळाळी प्राप्त केली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Export : दुबईला जाणारी हळद थांबली! दर २,५०० रुपयांनी कोसळले, वाचा कारण
अधिक वाचा : Tur Bajarbhav : तूर ८ हजाराच्या उंबरठ्यावर ; ‘या’ ठिकाणी अजूनही कमी दर
