Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Groundnut Market : भुईमुगाची जोरदार तेजी; अजून दर वाढणार? जाणून घ्या बाजाराचा अंदाज

Groundnut Market : भुईमुगाची जोरदार तेजी; अजून दर वाढणार? जाणून घ्या बाजाराचा अंदाज

latest news Groundnut Market: Groundnut prices are rising sharply; Will prices increase further? Know the market forecast | Groundnut Market : भुईमुगाची जोरदार तेजी; अजून दर वाढणार? जाणून घ्या बाजाराचा अंदाज

Groundnut Market : भुईमुगाची जोरदार तेजी; अजून दर वाढणार? जाणून घ्या बाजाराचा अंदाज

Groundnut Market : देशांतर्गत बाजारात सध्या भुईमुगाच्या दराने मोठी उसळी घेतली असून, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत. मर्यादित पुरवठा, घटलेले उत्पादन आणि वाढती देशांतर्गत तसेच निर्यात मागणी यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Groundnut Market)

Groundnut Market : देशांतर्गत बाजारात सध्या भुईमुगाच्या दराने मोठी उसळी घेतली असून, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत. मर्यादित पुरवठा, घटलेले उत्पादन आणि वाढती देशांतर्गत तसेच निर्यात मागणी यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.(Groundnut Market)

Groundnut Market : देशांतर्गत बाजारात सध्या भुईमुगाच्या दराने मोठी उसळी घेतली असून, गेल्या तीन वर्षांतील उच्चांकी भाव शेतकऱ्यांना मिळत आहेत.(Groundnut Market)

मर्यादित पुरवठा, घटलेले उत्पादन आणि वाढती देशांतर्गत तसेच निर्यात मागणी यामुळे बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भुईमुगाला प्रतिक्विंटल ७,५०० ते ९,००० रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.(Groundnut Market)

यंदाच्या हंगामात भुईमुगाच्या लागवड क्षेत्रात घट झाल्याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. अवकाळी पाऊस, बदलते हवामान आणि काही भागांतील कमी पेरणी यामुळे बाजारात अपेक्षेपेक्षा कमी माल दाखल होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चांगल्या प्रतीच्या भुईमुगासाठी स्पर्धा वाढली असून, दरांना मजबूत आधार मिळत आहे.(Groundnut Market)

देशांतर्गत बाजारात शेंगदाणा तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे. खाद्यतेल उद्योगाकडून भुईमुगाला चांगली मागणी कायम आहे.

याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही भारतीय भुईमुगाला मोठी मागणी निर्माण झाली आहे. विशेषतः इंडोनेशिया आणि इतर काही देशांकडून भारतातून होणाऱ्या निर्यातीत वाढ झाल्याने बाजारातील तेजी आणखी वाढली आहे.

सध्या बाजारात उच्च दर्जाच्या भुईमुगाला अधिक दर मिळत असून आगामी काही आठवड्यांतही तेजी कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी संपूर्ण माल एकाचवेळी विक्री करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने विक्री करण्यावर भर देत आहेत.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी घाईत विक्री न करता बाजारभावाचा अभ्यास करून योग्य वेळी माल विकल्यास अधिक फायदा मिळू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Groundnut Market : वसमतच्या मोंढ्यात नव्या भुईमुगाची एन्ट्री; शेतकऱ्यांना मिळतोय 'इतक्या' हजारांचा भाव

अधिक वाचा : Soybean Market : शेतकऱ्यांच्या गोदामात शून्य, बाजारात तेजी; सोयाबीन दरवाढीचं अजब गणित

Web Title : मूंगफली की कीमतों में उछाल: बाजार विश्लेषण और भविष्य की उम्मीदें

Web Summary : सीमित आपूर्ति और उच्च मांग के कारण मूंगफली की कीमतों में तेजी आ रही है, जो तीन साल के उच्च स्तर पर पहुंच गई है। किसानों को बाजार के रुझानों को ध्यान में रखते हुए रणनीतिक रूप से बेचने की सलाह दी जाती है, क्योंकि कीमतों के मजबूत रहने की उम्मीद है। निर्यात मांग भी मूल्य वृद्धि में योगदान कर रही है।

Web Title : Groundnut Prices Soar: Market Analysis and Future Expectations

Web Summary : Groundnut prices are surging due to limited supply and high demand, reaching three-year highs. Farmers are advised to sell strategically, considering market trends, as prices are expected to remain strong. Export demand is also contributing to the price rise.