Groundnut Market : राज्यात उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन चांगले झाल्यामुळे बाजार समित्यांमध्ये शेंगांची मोठ्या प्रमाणात आवक (Groundnut Arrival) होत आहे.
कारंजा बाजार समितीत तब्बल १,४०० क्विंटल भुईमुग शेंगांची नोंद झाली, तर मानोरा येथेही विक्रीला गती मिळाल्याचे चित्र आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी भुईमुग विक्रीस प्राधान्य दिले असून, कमाल दर ५ हजार ८०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. (Groundnut Arrival)
उन्हाळी हंगामात भुईमुगाचे भरघोस उत्पादन झाल्याने राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये शेंगांची मोठी आवक होत आहे. (Groundnut Arrival)
कारंजा बाजारात तब्बल १ हजार ४०० क्विंटल आवक नोंदली गेली असून, उत्कृष्ट प्रतीच्या शेंगांना प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंतचा दर मिळाला. मानोरा, अमरावती, संभाजीनगरसारख्या बाजारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. वाढती आवक, स्थिर दर आणि गुणवत्तेवर मिळणारा मोबदला पाहता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये भुईमुग शेंगांची आवक (Groundnut Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : भुईमुग शेंग (ओली)
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
02/07/2025 | ||||||
अकलुज | --- | क्विंटल | 8 | 3000 | 4500 | 4000 |
अमरावती- फळ आणि भाजीपाला | --- | क्विंटल | 76 | 4000 | 4500 | 4250 |
छत्रपती संभाजीनगर | --- | क्विंटल | 31 | 3400 | 4600 | 3850 |
खेड-चाकण | --- | क्विंटल | 60 | 3500 | 4500 | 4000 |
श्रीरामपूर | --- | क्विंटल | 16 | 3000 | 4000 | 3500 |
भुसावळ | --- | क्विंटल | 1 | 4000 | 4000 | 4000 |
सातारा | --- | क्विंटल | 3 | 3000 | 4000 | 3500 |
राहता | --- | क्विंटल | 1 | 2000 | 6000 | 4000 |
(सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)