Agriculture News : किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (बिगर आदिवासी क्षेत्रात) व महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक (आदिवासी क्षेत्रात) या दोन अभिकर्ता संस्थांतर्गत कार्यरत खरेदी केंद्राच्या प्रभावी संनियंत्रणाकरिता ५ सदस्यीय जिल्हानिहाय दक्षता पथके नेमण्यात येणार आहेत.
दक्षता पथकाची रचना
सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी- अध्यक्ष
निरिक्षण अधिकारी - सदस्य
२ पुरवठा अधिकारी- सदस्य
गोदाम व्यवस्थापक-सदस्य
उद्दिष्ट : धान/भरडधान्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता, प्रामाणिकता, किमान आधरभूत खरेदी निकषांचे पालन, लाभार्थी शेतकऱ्यांना वेळेत व योग्य मोबदला सुनिश्चित करणे तसेच खरेदी प्रक्रियदरम्यान अनियमितता व गैरव्यवहार टाळणे.
पथकाची कार्यकक्षा - खरेदी केंद्रावर व गोदामावर तपासवयाची सुची/दक्षता पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल
अ. खरेदी केंद्रांवर तपासणी करावयाची बाबी -
- शेतकरी नोंदणी करण्यासाठी अभिकर्ता संस्थांमार्फ़त नियुक्त खरेदी केंद्रांनी नोंदणी करतांना घेतलेले ऑनलाईन ७/१२ उता-यानुसार व प्रत्यक्ष गाव नंबर १२ (पिकपेरा) नुसार असलेल्या पिक नोंदणी.
- अभिकर्ता संस्थांमार्फ़त नियुक्त खरेदी केंद्रांकडुन नोंदणी केलेल्या सातबारा धारक शेतक-यांचे आधारकार्ड व त्यांचे बँक खाते याचा तपशिल.
- संस्थेकडे PoS मशिनची उपलब्धता तसेच सर्व शेतकऱ्यांची नोंदणी ही POS मशिनव्दारे करण्यात आली आहे याबाबतची पडताळणी करणे.
- विहीत नमुन्यात लेखा पुस्तके व अभिलेख जतन करण्यात आले आहेत का याची माहिती घेणे.
- खरेदी केंद्राकडे आवश्यक मूलभूत साधन सामुगी ज्यामध्ये, मॉयश्वर मिटर, चाळणी, ताडपत्री, इलेक्ट्रानिक वजन काटा, संगणक, स्कॅनर असलेला स्मार्ट फोन, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग इ. यांचा समावेश असेल.
- शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाची ऑनलाईन पावती संबंधीत शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत याची तपासणी करणे.
- खरेदी केंद्रावरील इलेट्रॉनिक वजन काट्यांची वैध प्रमाणपत्रे.
सदर शासन निर्णयाबाबतच्या अधिक माहितीसाठी इथे जाऊन या निर्णयाचा जीआर पाहता येईल.
