Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर 

Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर 

Latest news Gahu Market Which wheat is getting good price read in detail | Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर 

Gahu Market : कोणत्या गव्हाला चांगला दर मिळतोय, कुठून होतेय सर्वाधिक आवक, वाचा सविस्तर 

Gahu Market : गव्हाची आवक बाजारात होऊ लागली असून कुठल्या गव्हाला सर्वाधिक दर मिळतो आहे,

Gahu Market : गव्हाची आवक बाजारात होऊ लागली असून कुठल्या गव्हाला सर्वाधिक दर मिळतो आहे,

जळगाव : यंदा गव्हाची आवक मुबलक झाली आहे. एकीकडे सर्वच वस्तूंचे दर वाढत असताना गव्हाचे दर मात्र स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने मध्य प्रेदश आणि गुजरातमधून गव्हाची आवक होते. लोकवन आणि वन फोर सेवन(147) या प्रकारातील गहू सध्या उपलब्ध झाला आहे. 

तर चंदोसीसाठी दहा ते पंधरा दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. चंदोसी गहू हा महागडा असल्याने नेहमीच्या वापरात बहुतांश लोक वन फोर सेवन या प्रकाराला अधिक पसंती देतात. यंदा चंदोसी गव्हाचा दर ५० रुपये किलोच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

३० ते ३८ रुपये प्रतिकिलो दर
वन फोर सेवन हा गहू प्रामुख्याने मध्य प्रदेशातून आयात केला जातो. साधारण या प्रकारातला हा गहू हा ३० ते ३३ रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध आहे. यातीलच अधिक दर्जेदार गहू ३६ ते ३७ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत असून, हा गहू प्रामुख्याने गुजरातमधून आला आहे. दरम्यान, लोकवन या प्रकारातील गव्हाच्या किमतीत फारसा फरक नाही. 

एखादा रुपया दर कमी आहे. शेवयांसाठी वापरला जाणारा गुजरातमधील लोकवन मात्र ३८ ते ४० रुपये प्रतिकिलो आहे. यंदा गव्हाचे चांगले उत्पादन झाले आहे. परंतु, ग्राहक हे गुणवत्तेच्या दृष्टीने मध्य प्रदेश व गुजरातच्या गव्हाला अधिक पसंती देतात, असेही सांगण्यात आले.

गव्हाचे दर पाहुयात 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/03/2026
वरूड-राजूरा बझार---क्विंटल12200022002065
तुळजापूर---क्विंटल157210022002150
जळगाव१४७क्विंटल79215022752275
जळगाव - मसावत१४७क्विंटल152217522952200
परतूर२१८९क्विंटल79208122202150
औराद शहाजानी२१८९क्विंटल60190026002500
नागपूरलोकलक्विंटल2123215023082268
मुंबईलोकलक्विंटल13986290050003950
धरणगावलोकलक्विंटल600229024002400
सोलापूरशरबतीक्विंटल698247037903345
पुणेशरबतीक्विंटल527400050004500
नागपूरशरबतीक्विंटल1000320035003425

 

Web Title: Latest news Gahu Market Which wheat is getting good price read in detail