Gahu Bajarbhav : देशातील प्रमुख गहू उत्पादक राज्यांमधील विविध कृषी उत्पादन बाजारपेठांमध्ये सध्या किमती स्थिर आहेत. अनेक बाजारपेठांमध्ये किमती किमान आधारभूत किमतीपेक्षा खूपच जास्त आहेत.
आज ३० डिसेंबर २०२५ रोजी, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील अनेक बाजारपेठांमध्ये मॉडेल गव्हाचा दर २५०० ते २६०० प्रति क्विंटल आहे, तर महाष्ट्रातील बाजारपेठांमध्ये किमती २८०० रुपये ते २९०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्रातील करमाळा बाजारात सरासरी २७०० रुपये, परतूर बाजारात २१८९ व्हरायटीला २५०० रुपये, पाथर्डी बाजारात २९०० रुपये तर नांदगाव बाजारात २५५० रुपये दर मिळाला. सिल्लोड बाजारात अर्जुन व्हरायटीला सरासरी २५०० रुपये, पैठण बाजारात बन्सी गव्हाला २६०० रुपये दर मिळाला. तसेच शरबती गव्हाला सोलापूर बाजारात ३५२० रुपये, पुणे बाजारात ४८०० रुपये, नागपूर बाजारात ३३७५ रुपये तर कल्याण बाजारात ०३ हजार रुपये दर मिळाला.
मध्य प्रदेशातील गौतमपुरा या मार्केटमध्ये कमीत कमी २२०० रुपये, तर सरासरी २२१५ रुपये, जबलपूर बाजारात २२०० रुपये, रामनगर बाजारात २३०५ रुपये शहापूर बाजारात २६२१ रुपये, इंदूर बाजारात २९३३ रुपये, उज्जैन बाजारात २८३७ रुपये दर मिळाला.
तसेच उत्तर प्रदेशातील लालगंज बाजारात सरासरी २४५० रुपये, इटावा बाजारात सरासरी २४८५ रुपये, बरेली बाजारात २५६० रुपये, बाराबंकी बाजारात २५९० रुपये अजमगड बाजारात २५७० रुपये, तर बुलंद शहर बाजारात २५९० रुपये असा दर मिळाला.
