Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू?

Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू?

latest news Gahu Bajarbhav: Booming in wheat season! rates increased; Sell now or wait? | Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू?

Gahu Bajarbhav: गहू हंगामातच तेजीत! दर वाढले; आता विकू की थांबू?

Gahu Bajarbhav : यंदा हंगामातही गव्हाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. सध्या चांगला दर मिळत असला, तरी पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने अनेक जण साठवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे 'आता विकावे की थांबावे?' हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Gahu Bajarbhav)

Gahu Bajarbhav : यंदा हंगामातही गव्हाच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. सध्या चांगला दर मिळत असला, तरी पुढील काळात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने अनेक जण साठवणुकीकडे वळत आहेत. त्यामुळे 'आता विकावे की थांबावे?' हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.(Gahu Bajarbhav)

Wheat Market Price: रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या बाजारात यंदा वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. दरवर्षी हंगामात दर घसरत असताना, यंदा मात्र गव्हाच्या दरात क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे.

त्यामुळे पुढील काळात दर आणखी वाढतील या अपेक्षेने शेतकरी साठवणुकीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे.(Gahu Bajarbhav)

सध्या गव्हाचे दर साधारण २,२०० रुपयांच्या आसपास होते. मात्र नवीन गहूबाजारात येऊ लागल्यानंतर दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.(Gahu Bajarbhav)

यंदा बदलत्या हवामानाचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. थंडीचा कडाका कमी राहिल्याने दाण्यांची गुणवत्ता आणि वजन कमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अपेक्षित उत्पादन झाले नाही आणि बाजारात आवकही मर्यादित राहिली.(Gahu Bajarbhav)

विशेष म्हणजे, पहिल्या टप्प्यात पेरणी केलेल्या गव्हाची गुणवत्ता तुलनेने चांगली असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक भागांत एकरी उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा कमी आहे, तर दुसरीकडे सण-उत्सव आणि लग्नसराईमुळे मागणी सातत्याने वाढत आहे.(Gahu Bajarbhav)

आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होत असून, त्याचाही स्थानिक दरांवर प्रभाव पडत आहे.

डाळवर्गीय पिकांनाही आधार

गव्हासोबतच तूर आणि हरभरा या डाळवर्गीय पिकांच्या दरातही सुधारणा दिसून येत आहे. तुरीचा दर सध्या हमीभावापेक्षा सुमारे २०० रुपयांनी अधिक आहे. 

हरभऱ्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू असतानाच खुल्या बाजारातही चांगला उठाव आहे. उत्पादनातील घट आणि सणासुदीतील वाढती मागणी यामुळे दराला आधार मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

सोयाबीनच्या दरातही वाढ

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीही काहीसा दिलासा मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ४,४०० ते ४, ५०० रुपयांवर स्थिरावलेले दर आता ४,८०० ते ५,३०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कातील बदल आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील हालचालींमुळे ही वाढ झाली आहे.

एकूणच, यंदा हंगामात गहूसह प्रमुख पिकांच्या दरात अंशतः सुधारणा झाली असली, तरी बाजारातील मर्यादित आवक, हवामानाचा परिणाम आणि जागतिक घडामोडी यामुळे पुढील काळात दराचा कल कसा राहील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Shevga Market : शेवगा शेअर बाजारासारखा कोसळला; आवक वाढली, बाजारात नेमके काय घडले?

अधिक वाचा : Harbhara Market :हरभऱ्याची आवक वाढली; एप्रिलमध्ये भाव किती मिळणार?

Web Title : गेहूं की कीमतें बढ़ीं: अभी बेचें या इंतजार करें? बाजार विश्लेषण

Web Summary : मौसम के प्रभाव, कम उपज और बढ़ती मांग के कारण गेहूं की कीमतें बढ़ी हैं। किसान आगे और वृद्धि की उम्मीद में भंडारण कर रहे हैं। दालों और सोयाबीन की कीमतों में भी वृद्धि देखी गई, लेकिन भविष्य की प्रवृत्तियाँ वैश्विक कारकों और आपूर्ति पर निर्भर करती हैं।

Web Title : Wheat Prices Surge: Sell Now or Wait? Market Analysis

Web Summary : Wheat prices are up due to weather impact, lower yields, and rising demand. Farmers are storing, anticipating further increases. Pulses and soybeans also see price gains, but future trends depend on global factors and supply.