Lokmat Agro >बाजारहाट > Flower Market : फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Flower Market : फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

latest news Flower Market : Flower prices have collapsed; Read the reason in detail | Flower Market : फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Flower Market : फुलांचे दर कोसळले; काय आहे कारण वाचा सविस्तर

Flower Market : गौरी-गणपतीनंतर फुलांच्या बाजारपेठेत भावाचा कोसळता आलेख पाहायला मिळाला. गुलाब, झेंडू, काकडा, निशिगंध या फुलांचे दर आठ दिवसांत दहापटीने घसरले आहेत. मेहनतीने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.(Flower Market)

Flower Market : गौरी-गणपतीनंतर फुलांच्या बाजारपेठेत भावाचा कोसळता आलेख पाहायला मिळाला. गुलाब, झेंडू, काकडा, निशिगंध या फुलांचे दर आठ दिवसांत दहापटीने घसरले आहेत. मेहनतीने उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.(Flower Market)

शेअर :

Join us
Join usNext

शेषराव वायाळ

गौरी-गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर गगनाला भिडलेले फुलांचे दर सण संपताच अक्षरशः कोसळले असून, परतूर तालुक्यातील फुलशेती करणारे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडले आहेत. दरातील अचानक झालेल्या घसरणीमुळे फुलविक्री करणारे व्यापारीसुद्धा अडचणीत आले आहेत. (Flower Market)

फुलांच्या दरातील घसरण

सणाच्या काळात फुलांचे भाव गगनाला भिडले होते. गुलाब ३००–३५० रु.किलो, काकडा ८००–९०० रु. किलो, निशिगंध ३००–३५० रु.किलो, शेवंती ३००–४०० रु.किलो, झेंडू व गलांडा ८०–१२० रु.किलो दराने विकली जात होती. मात्र, आठ दिवसांतच हे दर खाली घसरले आहेत.

फुलांचा प्रकारसणातील दर (₹/किलो)सध्याचा दर (₹/किलो)
गुलाब३५०३० – ५०
काकडा९००२०० – ३००
निशिगंध३५०३० – ५०
शेवंती४००१०० – २००
गलांडा१००७०
झेंडू१२०१० – ३०
लाल शेवंती४००२००

झेंडूची फुले सध्या फक्त ३० रुपये प्रति किलो विकली जात आहेत, तर आठवडाभरापूर्वी हा दर १०० रुपये होता.

हवामानाचा बाजारपेठेवर परिणाम

मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांनी सणासाठी फुलांचे नियोजन करून मोठ्या आशेने उत्पादन घेतले. सणाच्या काळात सतत पडणाऱ्या पावसामुळे फुलांचे उत्पादन मर्यादित राहिले आणि दर वाढले. मात्र, मागणी संपताच दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या

तोडणी, वाहतूक आणि बाजारात पोहोचवण्याचा खर्च भरून निघत नाही.

काही शेतकरी फुलांची तोडणी थांबवून शेतीतच फुले सडू देत आहेत.

शासनाकडून फुलशेतीसाठी स्थिर दर आणि विमा योजनेची मागणी वाढली आहे.

फुलांच्या दरात घसरण

फुलांच्या दरातील अचानक वाढ व घसरणीमुळे केवळ शेतकरीच नव्हे तर आम्ही विक्रेतेही अडचणीत येतो. अनेकदा मोठ्या दराने खरेदी केलेली फुले काही तासांतच कमी दरात विकावी लागतात. - अशोक काळे, फुलविक्रेते

तज्ज्ञ काय सांगतात?

फुलशेतीतील उत्पादन-विपणनासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग किंवा थेट विक्री यंत्रणा विकसित करावी.

साठवणूक व थंड साखळी सुविधा उपलब्ध केल्यास दरातील चढ-उताराचा फटका कमी होऊ शकतो.

शासनाने स्थिर बाजारपेठ व समर्थन दरासाठी योजना राबवावी.

हे ही वाचा सविस्तर : Zendu Market : झेंडूची मागणी वाढली; दसरा-नवरात्र सणांसाठी भावात तेजी अपेक्षित

Web Title: latest news Flower Market : Flower prices have collapsed; Read the reason in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.