लासलगाव : डॉ. भाभा अणुसंशोधन केंद्रअंतर्गत कृषक विकिरण केंद्रातून यंदाच्या हंगामातील 'हापूस' आंब्याची पहिली निर्यात मंगळवारी (दि. ७ एप्रिल) अमेरिकेकडे रवाना करण्यात आली. सुमारे १,१०० बॉक्समधील चार टन हापूस आणि केशर आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा माल न्यूयॉर्क येथे पाठविण्यात आला आहे.
वरिष्ठ अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिवसांपूर्वी लासलगाव केंद्राची आठ तपासणी केली होती. त्यांच्या पाहणीनंतर आवश्यक प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण झाल्याने यंदा आंबा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे.
२००७ मध्ये प्रथमच आंब्याच्या विकिरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रकल्प भाभा अणुसंशोधन केंद्राकडे होता. पुढे पणन मंडळ, मुंबईस्थित 'अॅग्रो सर्च' कंपनी आणि अलीकडे राहुरी येथील 'हिंदुस्थान अॅग्रो लिमिटेड' कंपनीकडे हा प्रकल्प चालविण्याचा करार करण्यात आला.
मागील वर्षी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आंबा निर्यात होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने निर्यातीला वेग आला आहे. याबाबत हिंदुस्थान ॲग्रो कोप लिमिटेडचे भारत ढोकणे-पाटील, केंद्राचे संजय आहेर यांनी माहिती दिली. कोकण पट्टयातील हापूस, गुजरातमधील केशर आंबा केंद्रात दाखल झाला.
...या जातीच्या आंब्यांची होते निर्यात
हापूस, अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, दशहरा, वेगनपल्ली, लंगडा, चौसा या जातीच्या आंब्याची निर्यात होते.
...या देशांमध्ये मागणी
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, सॅन फ्रान्सिसको, लॉस एंजिल्स, शिकागो, न्यू जर्सी, ह्युस्टन आदी देशांमध्ये मागणी आहे. मागील वर्षी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे आंबा निर्यात होऊ शकली नव्हती. मात्र, यंदा प्रक्रिया पूर्ण झाल्याने निर्यातीला वेग आला असुन आंबे खाना करण्यात आले आहे.
