नाशिक : यंदाच्या अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, आता रासायनिक खतांच्या किमतीत प्रति बॅग १०० ते २०० रुपयांनी झालेल्या वाढीमुळे शेतकरी नव्या संकटात सापडले आहेत. खरीप हंगाम कोसळल्यानंतर आता रब्बीच्या पेरणीसाठीही अधिकचा खर्च करावा लागत असून, अनेकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.
येत्या काळात ५० रुपयांची वाढ होणार
दरवर्षी खतांची मागणी कमी-१ जास्त होत असली तरी उत्पादक कंपन्यांनी किंमत वाढविण्याचे धोरण कायम ठेवले आहे. केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून २ खतांच्या किमतीत १०० ते २०० रुपयांची वाढ केली आहे. दरवर्षी खतांच्या किमतीत वाढ होत आहे.
तुलनेत शेती करण्याऱ्यांची संख्यादेखील ३३ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. खतांच्या भाववाढीमागे लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात घटल्याने किमतींवर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बॅगमागे किमान ५० रुपयांची वाढ होणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पहा खतांची झालेली दरवाढ
- खतांचे नाव : १० २६ २६ - आधीची किंमत १७६० रुपये, सध्याची किंमत १९०० रुपये, १५० रुपयांची वाढ
- खताचे नाव : १४ ३५ १४ - आधीची किंमत १८०० रुपये, सध्याची किंमत १९५० रुपये, १५० रुपयांची वाढ
- खताचे नाव : १२ ३२ १६ - आधीची किंमत १७५० रुपये, सध्याची किंमत १९०० रुपये, १५० रुपयांची वाढ
- खताचे नाव : २४ २४ ०० - आधीची किंमत १८०० रुपये, सध्याची किंमत १९०० रुपये, १०० रुपयांची वाढ
- खताचे नाव : ८ २१ २१ - आधीची किंमत १८०० रुपये, सध्याची किंमत १९७५ रुपये, १७५ रुपयांची वाढ
- खताचे नाव : ९ २४ २४ - सध्याची किंमत १९०० रुपये, सध्याची किंमत २१०० रुपये, २०० रुपयांची वाढ
- खताचे नाव : पोटॅश - आधीची किंमत १६५५ रुपये, सध्याची किंमत १८०० रुपये, १४५ रुपयांची वाढ
Read More : बांग्लादेशाने कांदा आयात परवाने वाढवले, चौपट निर्यात होणार, भाव कसे राहतील?
