Join us
Daily Top 2Weekly Top 5

गत तीन वर्षातील फेब्रुवारी महिन्यात तुरीचे दर कसे होते, येत्या फेब्रुवारीत दर कसे राहतील? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 13:45 IST

Tur Market In February : पुढील फेब्रुवारी २०२६ मध्ये दर कसे राहणार आहेत, ते पाहुयात.... 

Tur Market In February :  खरीप हंगाम २०२५-२६ साठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) ८ हजार रुपये प्रति क्विंटल असून सध्याच्या तुरीच्या किंमती MSP च्या दिशेने जाताना दिसून येत आहे. तर पुढील फेब्रुवारी २०२६ मध्ये दर कसे राहणार आहेत, ते पाहुयात.... 

गतवर्षीच्या दरापेक्षा चालू वर्षी तुरीचे भाव कमी आहेत. मागील तीन वर्षातील लातूर बाजारपेठेतील तुरीच्या फेब्रुवारीमधील सरासरी किंमती खालीलप्रमाणे :  फेब्रुवारी २०२३ मध्ये ७ हजार ७०३ रुपये प्रति क्विंटल, फेब्रुवारी २०२४ मध्ये १० हजार १२८ रुपये प्रति क्विंटल, फेब्रुवारी २०२५ मध्ये ७ हजार २२३ रुपये प्रति क्विंटल होत्या. 

सद्यस्थितीत तुरीच्या किंमतीत सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. कारण मासिक आवकमध्ये घट होत आहे. त्या अनुषंगाने फेब्रुवारी २०२६ करिता तुरीच्या संभाव्य किंमती : ७ हजार २०० रुपये ते ७ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

तूर हे खरीप पिक असून त्याची पेरणी जून ते जुलै व काढणी डिसेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या प्रथम अग्रीम उत्पादन अंदाज सन २०२५-२६ नुसार तुरीचे उत्पादन सुमारे ३५.९७ लाख टन होण्याची शक्यता आहे.

तसेच महाराष्ट्रातील सन २०२४-२५ मध्ये १३.३ लाख टन आहे. वर्ष २०२४-२५ मध्ये तुरीच्या आयाती मध्ये वाढ झालेली असून निर्यात कमी कमी झालेली आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून फेब्रुवारी २०२६ या कालावधीसाठी तूर पिकाच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tur Price Trends: Past February Data and Future Predictions

Web Summary : Tur prices varied over the last three Februarys. February 2026 prices are predicted to range from ₹7,200 to ₹7,850 per quintal due to decreased monthly arrivals. Production estimates for 2025-26 are around 35.97 lakh tonnes. Import increased and export decreased in 2024-25.
टॅग्स :शेती क्षेत्रतुराकृषी योजनामार्केट यार्डशेतकरी