नंदुरबार : पपई दर नियंत्रण समिती व पपई व्यापारी यांच्यात बैठक होऊन दरांचा तिढा सोडविण्यात आला आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या समोर दोन चाललेल्या बैठकीनंतर पपईला सात रुपये दर देण्यावर निर्णय झाला आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीत पपई उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी आपापली बाजू मांडली होती. व्यापारी आणि शेतकरी अशा दोघांनीही संमती दिल्याने सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. या बैठकीतून जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांच्या पुढाकाराने पपईला प्रतिकिलो ७ रुपये दर देण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने भाव जाहीर करण्यात आल्यानंतर शहादा तालुक्यातील पपई तोड सुरू करण्यात आलेली आहे. व्यापाऱ्यांची आता कोणत्याही प्रकारे वाहने अडवली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, व्यापाऱ्यांनीही दर कमी न करण्याचे निश्चित करण्यात आले.
पणनमंत्री रावल यांची भेट पपई उत्पादकांनी मांडली व्यथा
पपई दरावरून व्यापारी व शेतकरी यांच्यात गेल्या आठवडाभरापासून संघर्ष पेटला आहे. व्यापारी शेतकरी मागणी करीत असलेला ८ रुपये ११ पैसे प्रतिकिलो दर देण्यास असमर्थता दर्शवित असल्याने शेतकऱ्यांनी पपई तोड बंद करून व्यापाऱ्यांच्या गाड्या जमा करण्याचा इशारा दिला होता. नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्यासोबत बैठक घेण्याचे ठरले. त्यानंतर झालेल्या बैठकीत पपईला प्रतिकिलो ७ रुपयांचा दर देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
