Cotton Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किमत (MSP) ७ हजार ७१० रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. या एप्रिल महिन्यात दर कसे मिळतील, हे पाहुयात...
मागील तीन वर्षातील अकोला बाजारातील कापसाच्या एप्रिल महिन्यातील सरासरी किमती पुढील प्रमाणे -
- एप्रिल २०२३ मध्ये ८ हजार १०१ रुपये प्रति क्विंटल
- एप्रिल २०२४ मध्ये ७ हजार ६११ रुपये प्रति क्विंटल
- एप्रिल २०२५ मध्ये ७ हजार २५२ रुपये प्रति क्विंटल
तर यंदाच्या एप्रिल २०२६ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार ४४५ ते ७ हजार ८६५ रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२५-२६ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२४-२५) तुलनेत ७.०२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.
USDA-FAS मुंबईच्या अंदाजानुसार विपणन वर्ष २०२४-२५ मध्ये भारतातील कापूस उत्पादन ११.२ वशलक्ष हेक्टर (११२ लाख हेक्टर) क्षेत्रावर ३०५ लक्ष गाठी होण्याच्या अंदाज वर्तवला आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी आहे. शेतकरी कापूस लागवडीचे क्षेत्र डाळी, मका आणि भात यासारख्या उच्च परतावा पिकांकडे वळतील असा अंदाज आहे.
- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील 'बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा' अंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून एप्रिल २०२६ या कालावधीसाठी कापूस पिकाच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
