Cotton Market : भारतात कापसाच्या बाजारात मागणी कमी झाल्याने दर स्थिरावले असून, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष नवीन हंगामाकडे लागले आहे. जागतिक बाजारातही कापसाला पुरेशी मागणी नाही, परिणामी दरांमध्ये काहीशी घट दिसून येत आहे. (Cotton Market)
१८ जुलै २०२५ रोजीच्या भावानुसार सप्टेंबरपर्यंत किंमतींमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता नाही, असे चित्र आहे.(Cotton Market)
गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात फारसा बदल झालेला नाही. बाजार स्थिर आहे, कारण मागणी कमी आहे आणि जागतिक बाजारातही मोठी हालचाल नाही. यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि बाजार सुधारण्याची वाट बघावी. (Cotton Market)
सध्याचे दर किती?
सप्टेंबरपर्यंत कापसाला ५४ हजार ६०० ते ५६ हजार ६०० रुपये प्रतिकॅंडी (३५६ किलो) दर मिळतोय.
कापसाच्या बी (कापसी) दरही ९ हजार ३०० ते ९ हजार १४५ रुपये प्रति २० किलो आसपास आहे.
कापूस प्रति क्विंटल सध्या सरासरी ६ हजार ७२७ ते ६ हजार ९२७ रुपये दराने विकला जातोय.
का कमी झाली मागणी?
जगात सध्या चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशकडून कापसाची खरेदी कमी झाली आहे.
आपल्याकडेही तयार माल पुरेसा असल्यामुळे व्यापारी थांबले आहेत.
नवीन हंगामाची वाट बघत असल्यामुळे खरेदी मंदावली आहे.
शेतकऱ्यांनी काय करावे?
* सध्या बाजारात कापूस विक्री करण्याची घाई करू नका.
* चांगल्या दरासाठी बाजारावर लक्ष ठेवा.
* नवीन हंगाम सुरू होईपर्यंत दर स्थिर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
जगात काय स्थिती?
* पाकिस्तान, बांगलादेश यांच्याकडून मागणी कमी झाली आहे.
* चीनकडूनही खरेदी थोडीच झाली आहे.
* भारतातही सध्या व्यापाऱ्यांकडे पुरेसा साठा असल्यामुळे दर वाढले नाहीत.
तज्ज्ञ काय सांगतात
२०२४-२५ मध्ये जागतिक उत्पादन कमी होईल, असं भाकीत आहे, त्यामुळे पुढे दर वाढण्याची शक्यता आहे. पण सध्या मात्र बाजार स्थिर आहे.
ताजे दर (१८ जुलै २०२५)
स्पॉट (राजकोट) : ५५,६०० रु. प्रति कँडी
३१ जुलै फ्युचर्स : ५६,६०० रु. प्रति कँडी
३० सप्टेंबर फ्युचर्स : ५८,५०० रु. प्रति कँडी
कापूस फ्युचर्स (२० किलो) : ९,१४५ रु. (३० एप्रिल २०२६)
(स्रोत : MCX, NCDEX आणि बाजार समित्या)